Join us  

समीरा रेड्डीने शेअर केले प्रेग्नन्सीतले अंडरवॉटर फोटोशूट, ती म्हणते, बाळं पोटात असताना....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 11:29 AM

Sameera Reddy Posts Throwback Video of Underwater Pregnancy Photoshoot : समीरा देते स्त्रियांना ‘हा’ खास सल्ला

ठळक मुद्देसमीरा रेड्डीने अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे. या जोडप्याला नायरा वर्दे आणि हंस वर्दे नावाची दोन मुले आहेत.समीरा स्पष्टवक्ती असल्याने आणि आपले मत ठामपणे व्यक्त करत असल्याने महिला वर्गाला ती आपली मैत्रीण असल्यासारखी वाटते.

प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डीसोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना चाहत्यांशी शेअर करण्याबरोबरच ती नेहमी काही ना काही सल्ले देत असते. वास्तववादी पोस्ट टाकणारी अभिनेत्री म्हणून सध्या समीरा रेड्डी ओळखली जाते. अभिनेत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून, स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात जे काही बदल होतात, ते स्पष्टपणे आणि अगदी खरेपणाने मांडते. म्हणूनच तर अनेकजणींना तिचे प्रॉब्लेम स्वत:चेच असावेत, इतके जवळचे वाटतात. नुकतेच तिने आपले प्रेग्नन्सीमधले फोटोशूट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे शूट अंडरवॉटर असल्याने बेबी बंपसोबत समीरा पाण्यात वेगवेगळ्या कपड्यांमध्ये पोझेस देताना दिसत आहे (Sameera Reddy Posts Throwback Video of Underwater Pregnancy Photoshoot). 

(Image : Google)

समीरा तिच्या मातृत्वाच्या तसेच गरोदरपणाच्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने बोलते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणातील फोटो शेअर करत तिचा अनुभव  सांगितला आहे. तिने गरोदरपणात पाण्याखाली फोटोशूट केले होते. हे फोटो शेअर करत ती म्हणते, 'बाळंतपण हा प्रत्येक स्त्रीसाठी सुंदर अनुभव असतो. माझ्यासाठीही होता. या काळात स्त्रीचं शरीर सर्वात सुंदर दिसतं. हा एक चमत्कार असतो.' 'या काळात तुमच्यामध्ये बरेच बदल होतात. पण त्याला न लाजता आनंदाने सामोरे जा. हा काळ उत्साहाने साजरा करा असा सल्लाही ती आपल्या चाहत्यांना देते. आपल्या या फोटोशूटच्या व्हिडिओला कॅप्शन देताना ती म्हणते, एरवी तुम्हाला कधीच वाटणार नाही, इतकं यावेळी मला सर्वात सुंदर वाटतं होतं..लाजू नका तर या काळात तुमच्या शरीरासोबत आणि स्वत:सोबत एन्जॉय करा.

सध्या समीरा बॉलीवूडपासून दूर असली तरी आत्तापर्यंत बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतून आपण तिला पाहिले आहे. बॉलीवूडमध्ये ब्रेक घेतल्याने ती बरीच चर्चेत आली होती. तसेच ती तिच्या सासू सोबतचेही काही मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर समीराचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून तिच्या सगळ्या पोस्टला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. समीरा स्पष्टवक्ती असल्याने आणि आपले मत ठामपणे व्यक्त करत असल्याने महिला वर्गाला ती आपली मैत्रीण असल्यासारखी वाटते. फिटनेस आणि डाएटबाबत जागृती करण्याचे काम सध्या समीरा करत आहे. समीरा रेड्डीने अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे. या जोडप्याला नायरा वर्दे आणि हंस वर्दे नावाची दोन मुले आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियासमीरा रेड्डीप्रेग्नंसी