Join us  

एका दिवसांत २५ हजार समोसे बनवणारा पाहा कारखाना, एवढे समोसे खाणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 4:58 PM

Samosa Factory That Makes 25 Thousand Samosa Daily: समोसा बनविणाऱ्या या कारखान्यात बघा कसे पटापट समोसे तयार होतात (Viral video of making samosa)..

ठळक मुद्देतुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर एकदा बघून घ्या आणि तिथे समोसे कसे तयार केले जातात, ते ही पाहा.

समोसा हा बहुसंख्य भारतीयांचा आवडीचा पदार्थ. अगदी साध्या टपरीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत तो कुठेही मिळतो. आतमध्ये खमंग, चवदार अशी बटाट्याची भाजी आणि त्यावर असणारं कुरकुरीत आवरण असा क्रिस्पी, क्रंची गरमागरम समोसा समाेर आला तर अनेकांचे डाएटिंगचे प्लॅन अगदी पार फिसकटून जातात. आता आपला हा लाडका समोसा बनविण्याचा चक्क एक कारखाना (Samosa factory that makes 25 thousand samosa daily) असून सध्या त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर एकदा बघून घ्या आणि तिथे समोसे कसे तयार केले जातात, ते ही पाहा. (Samosa making machine)

 

आता समोसा करणं हे काही म्हणावं एवढं सोपं काम नाही. कारण एकतर त्यासाठी त्याच्या आतली जी भाजी आहे, ती छान जमली पाहिजे आणि दुसरं म्हणजे समोस्याच्या वरचं आवरण कुरकुरीत झालं पाहिजे.

बेडवर टाकलेलं बेडशीट २ दिवसांतच चुरगळतं? २ उपाय, बेडशीट राहील इस्त्री केल्याप्रमाणे ताठ

यासाठी मैदा आणि गव्हाचं पीठ तसेच ते भिजविण्यासाठी पाणी...यांचं प्रमाण अचूक हवं. समोसा तळण्याची पद्धत योग्य हवी. कारण असं सगळं जर जमून आलं तरच समोसा कुरकुरीत होतो. अन्यथा मऊ पडतो. पण आता हे सगळं एका कारखान्यात वेगवेगळ्या मशिनद्वारे केलं जात आहे. eatwithdelhi या इन्स्टाग्राम पेजवरून याविषयीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की सगळ्यात आधी एका ड्रमसारख्या दिसणाऱ्या मशिनमधून बटाटे धुवून- उकडून आणि सोलून घेतले जात आहेत. त्यानंतर एका मोठ्या मशिनमध्ये त्यापासून भाजी केली जाते.

समंथा प्रभुच्या १. ३८ लाखांच्या साडीवरची सुंदर एम्ब्रॉयडरी - ब्लाऊजवर स्टोन वर्क, ' असे ' कॉम्बिनेशन करायचे तर..

कणिक भिजविण्यासाठीही मिक्सरप्रमाणे एक मोठं मशिन आहे. त्यात सगळं साहित्य टाकलं की कणिक भिजली जाते. नंतर त्याच्या मोठमोठाल्या पोळ्या लाटून बाहेर पडतात. एवढं सगळं मशिनने झाल्यानंतर पोळ्या कापणे, त्यात समोस्याचं सारण भरणे आणि नंतर ते तळणे ही कामं मात्र हातानेच करावी लागत आहेत. या कारखान्यात एका दिवशी २५ हजार समोसे तयार होतात, असं या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे. पण हा कारखाना नेमका कुठे आहे आणि हे सगळे समोसे कुठे पुरवले जातात, याची मात्र माहिती तिथे उपलब्ध नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.व्हायरल फोटोज्