Join us  

सानिया मिर्झा म्हणते ८ वर्षांची असताना मला सगळे म्हणायचे- "तुझं लग्न होणार नाही, कारण....."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 3:33 PM

स्वत:विषयीचा फार मजेदार किस्सा सांगत सानिया मिर्झाने (Sania Mirza) मुलींकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीचं खूप छान वर्णन केलं आहे.

ठळक मुद्देती म्हणते तेव्हा मी अवघी ८ वर्षांची होते. लग्न वगैरे हे सगळं माझ्या समजण्याच्या खूप पलिकडे होतं. तरीही त्या वयात मला असे सल्ले दिले जायचे.

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिच्याविषयी नेहमीच बहुतांश जणांना आकर्षण असतं. क्रिडा विश्वात ती आली आणि तेव्हापासून मुलींना एखादा खेळ शिकविण्याचा ट्रेण्डच आला. आज क्रिडा क्षेत्रात नाव कमावू शकणाऱ्या कित्येक मुलींसाठी ती रोल मॉडेल आहे. क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांना ग्लॅमर आहे, ओळख आहे याची दृष्टी तिच्यामुळेच अनेक पालकांना, मुलींना मिळाली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आज तिने ही गगनभरारी घेतली असली तरी तिने जेव्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या लहानपणी तिला इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच टोमणे ऐकावे लागले, वेगवेगळ्या सुचना मिळाल्या. त्याचाच छानसा किस्सा तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. 

 

shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवरून सानियाच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये सानिया म्हणते की ती खूप खेळायची.

घरात घालण्यासाठी चपला घ्यायच्या? बघा ३ पर्याय- कमी किमतीत घ्या आरामदायी चपला 

तेव्हा तिच्या आजुबाजुचे लोक, तिचे नातेवाईक तिला नेहमी म्हणायचे की एवढं उन्हात खेळू नको. उन्हामुळे तु काही झालीस तर तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. ती म्हणते तेव्हा मी अवघी ८ वर्षांची होते. लग्न वगैरे हे सगळं माझ्या समजण्याच्या खूप पलिकडे होतं. तरीही त्या वयात मला असे सल्ले दिले जायचे. मुलींनी सुंदरच असावं, त्यांनी छानच दिसावं म्हणजे त्यांचं लग्न होईल, असे अनेकांचे पक्के विचार आहेत. त्यातूनच मग मुलींनी काय करावं, काय करू नये हे ठरवलं जातं. 

 

सानिया पुढे म्हणते की आपल्याकडे मुलींनी कसं वागावं- काय करावं याची खूपच पक्की पाळंमुळं समाजात खूप खोलवर रुतलेली आहेत. मुलींनी घराबाहेर जाऊन खेळू नये. घरात बसून इतर मुलींसोबतच खेळावं.

सिल्कची साडी घरी धुण्याची सोपी पद्धत, साडीची चमक जाणार नाही- ड्रायक्लिनचा खर्चही वाचेल 

बाहुलीचे खेळ खेळावेत, असे अनेक अलिखित नियम आपल्याकडे आहेत. हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे, असंही तिने पुढे नमूद केलं. खरंच तसं जर झालं तर लहानग्या वयात मुलींवर येणारी अनेक बंधनं खरोखरच खूप प्रमाणात कमी होऊ शकतात..

 

टॅग्स :सोशल व्हायरलसानिया मिर्झाइन्स्टाग्राम