Lokmat Sakhi >Social Viral > परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा

परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा

Sara Ali Khan Gives Sunshine Vibes In Yellow Saree In Goa : गोव्याच्या किनाऱ्यावर अवतरली सनशाईन, सुंदर-सिंपल लूकने चाहत्यांचं जिंकलं हृदय..पाहा तिचा सोज्वळ लूक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 07:15 PM2023-11-26T19:15:22+5:302023-11-26T19:16:43+5:30

Sara Ali Khan Gives Sunshine Vibes In Yellow Saree In Goa : गोव्याच्या किनाऱ्यावर अवतरली सनशाईन, सुंदर-सिंपल लूकने चाहत्यांचं जिंकलं हृदय..पाहा तिचा सोज्वळ लूक..

Sara Ali Khan Gives Sunshine Vibes In Yellow Saree In Goa | परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा

परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा

बॉलीवूडची चुलबुली गर्ल सारा अली खान (Sara Ali Khan), आपल्या नटखट अदा आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिने कमी काळात आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सारा आपल्या फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखली जाते. तिचा नुकताच पिवळ्या साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हा फोटो इफ्फी चित्रपट महोत्सवातील असून, या महोत्सवात तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती, व तिने हे फोटो गोव्याच्या किनाऱ्यावर काढले आहेत. साराचे हे मनमोहक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या साडीची नेमकी खासियत काय? तिचा हा पारंपारिक लूक एवढा व्हायरल का होतोय? पाहूयात(Sara Ali Khan Gives Sunshine Vibes In Yellow Saree In Goa).

सारा पिवळ्या रंगाच्या साडीत दिसते सनशाईन

साराने नुकतंच ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (इफ्फी)ला हजेरी लावली. तिचा लवकरच 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या खास इव्हेंटसाठी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसून खास लूक तयार केला. सारा ट्रेडीशनल आणि क्लासी लूकसाठी ओळखली जाते. दरम्यान, यंदा पिवळ्या रंगाची हँडलूम साडी परिधान करून तिने अनेकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. या साडीची खासियत म्हणजे गुजराथीतील खास मशरू फॅब्रिकवर, लहान पाढंऱ्या रंगाची फुले ओवून तयार करण्यात आली आहे. शिवाय एल्बो-लेंथ स्लीव्स ब्लाउजमुळे तिचा साडीतील लूक आणखीन बहारदार खुलला आहे.

लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी पटेल यांनी स्टाईल केलेल्या एक्सेसरीज घालून, तिने सिंपल-सोबर लूक ठेवला. साडीवर तिने फक्त सोन्याचे कानातले, शिवाय पायात हिल्स घालून आपला सुंदर लूक पूर्ण केला आहे. शिवाय साराने लो मेकअप लूक ठेऊन आपल्या नॅच्युरल ग्लोवर लूक पूर्ण केला आहे.

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल झाले? करून पाहा मेथी दाण्याचे ३ सोपे उपाय; वजन घटेल-दिसाल सुडौल

साराने या साडीवरील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''हँडक्राफ्टेड साडीमध्ये, भारतीय नारी. सनशाईन आणि डेझी फ्लॉवर आहेत खूप प्यारी. जवळ असलेलं समुद्र आणि हिरव्यागार झाडी आहेत छान. के मै जाऊ वारी-वारी.'' साराची ही सुंदर साडी डिझाईनर ब्रँड पेरो यांनी डिझाईन केले असून, तिच्यावरही साडी खूप उठून दिसत आहे.

Web Title: Sara Ali Khan Gives Sunshine Vibes In Yellow Saree In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.