सणासुदीला साडी नेसण्याची हौस प्रत्येक महिलेची असते. पण साडी नेसून काम करताना किंवा उठबस करताना खूपच अवघडल्यासारखं वाटतं. (Saree Styling Tips) कधी साडी व्यवस्थित न नेसल्यामुळे तर कधी साडी योग्य पद्धतीनं कॅरी करण्याची सवय नसल्यानं कधी एकदा साडी काढतोय असं वाटतं. (How seat properly in saree styling tips)
इंस्टाग्रामवर एका तरूणीनं साडी नसेल्यानंतर बसण्याची योग्य पद्धत दाखवली आहे. वांगी रंगाच्या साडीत तिचा लूक अधिकच खुलून दिसतोय. मंदिरातील विवाहसोहळा असो किंवा पूजा असो, आपल्या सर्वांवर साडी नेसून जमिनीवर बसावे लागते. आणि सुरुवातीला ते क्लिष्ट वाटू शकते, परंतु ते खरोखर कठीण नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे बसता तेव्हा तुमचा पल्लू आणि प्लीट्स काळजीपूर्वक धरून ठेवा. आशा आहे की ही पद्धत तुम्हाला मदत करेल. असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.
"या व्हिडिओचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे जे क्वचितच साडी नेसतात आणि त्यांना जमिनीवर बसणे आव्हानात्मक वाटू शकते कारण ते प्लीट्स आणि एकूणच लूक खराब करते. अशी टिप व्हिडिओच्या खाली नमुद करण्यात आली आहे. या पोस्टवर "साडीत बसणे इतके अवघड आहे असे मला वाटत नाही. म्हणजे आपण आपल्या मोठ्यांकडून हेच शिकतो आणि साडीत बसून छान दिसण्याचं दडपण का? एखाद्याला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने बसा. साडी ही फ्लुइड फॅब्रिक आहे आणि ती कम्फर्ट द्यायला हवी, दबाव नाही. अशी कमेंट एका युजरनं केली आहे. आतापर्यंत ६६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.