Lokmat Sakhi >Social Viral > साडी तीही तब्बल २१ लाख रुपयांची ! लखनऊच्या साडीचे आगळेवेगळे नवाबी थाट...

साडी तीही तब्बल २१ लाख रुपयांची ! लखनऊच्या साडीचे आगळेवेगळे नवाबी थाट...

Saree worth ₹21 lakh made with pearls from Japan, real Swarovski turns out to be an eye-catcher : जपानमधील मोत्यांनी बनवलेली २१ लाख रुपयांची व खरे स्वरोवस्की रत्न जडवलेली साडी ठरली लक्षवेधी... पहा या साडीची खासियत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 07:49 PM2023-07-13T19:49:55+5:302023-07-13T20:03:08+5:30

Saree worth ₹21 lakh made with pearls from Japan, real Swarovski turns out to be an eye-catcher : जपानमधील मोत्यांनी बनवलेली २१ लाख रुपयांची व खरे स्वरोवस्की रत्न जडवलेली साडी ठरली लक्षवेधी... पहा या साडीची खासियत...

Sari worth Rs 21 lakhs made with pearls from Japan, real Swarovski turns out to be an eye-catcher. | साडी तीही तब्बल २१ लाख रुपयांची ! लखनऊच्या साडीचे आगळेवेगळे नवाबी थाट...

साडी तीही तब्बल २१ लाख रुपयांची ! लखनऊच्या साडीचे आगळेवेगळे नवाबी थाट...

स्त्रिया आणि त्यांचे साडीप्रेम हे एक समीकरणच बनले आहे. स्त्रिया त्यांचे साडीप्रेम शब्दांत व्यक्त करु शकत नाहीत. एखादी साडी जर त्यांच्या मनात भरली तर ती विकत घेण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही. साडी हा महिलांसाठी फारच जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी आणि स्त्री च एक अतूट नात असतं. घरात लग्नसराई असो किंवा एखादा सण आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या तरीही खास प्रसंगाला खास साडी घेतल्याशिवाय स्त्रिया शांत राहूच शकत नाहीत.  साड्यांची खरेदी करायला तर महिलांना निमित्तच हवे असते. सणवार, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा या ना त्या निमित्ताने साडी खरेदी ठरलेलीच असते. मग अमुक एक नवीन पॅटर्न आलाय, असा रंग आपण बरेच वर्षात घातला नाही. हिच्याकडे आहे तशी साडी मलाही हवी अशा एक ना अनेक गप्पा सुरू होतात. महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साडीसाठी महिला कितीही तास फिरु शकतात किंवा कितीही दुकानं पालथी घालू शकतात. 

जेव्हा आपण भारतीय परंपरेबद्दल बोलतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. त्यापैकी एक म्हणजे साडी. हा सर्वात सुंदर आणि मोहक पोशाख आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे. साड्यांचे असंख्य न मोजता येणारे इतके प्रकार, डिझाइन्स, रंगसंगती, पॅटर्न, कापडाचा प्रकार अशा अनेक गटांत साड्यांचे वर्गीकरण करता येऊ शकते. आजकाल साडीची आणखी एक विविधता आहे जी तिच्या किमतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महागड्या साडीची चर्चा सुरु आहे. नेमकं या साडीत असं काय वेगळेपण आहे ते तरी पाहूयात(Saree worth ₹21 lakh made with pearls from Japan, real Swarovski turns out to be an eye-catcher).

काय आहे साडीची खासियत... 

स्टोअर मॅनेजर हैदर अली खान यांनी (ANI) ए. एन. आयला दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील मोत्यांनी बनवलेली २१ लाख रुपयांच्या किमतीची साडी त्यांच्याजवळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही संपूर्ण साडी एकाच वायरवर बनवली जाते आणि त्यामुळेच या साडीची किंमत तब्बल २१ लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. या सुंदरशा पांढऱ्या शुभ्र साडीची किंमत चक्क २१ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी साडी बनवायला व त्यावरची कलाकुसर आणि बारीक नक्षीकाम करण्यासाठी बराच वेळ लागतो. इतकेच नव्हे तर हे नक्षीकाम इतके नाजूक व बारीक असते की नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांच्या डोळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळेच या साडीवरचे नक्षीकाम व कलाकुसर पूर्ण होऊन साडी बनवायला चक्क दोन वर्षांचा कालावधी लागला. 

तुमचे कपडेच हेल्थ अपडेट देतील, इन्फेक्शनपासून बचाव करतील ! फॅशनच्या जगातही नवी स्मार्ट क्रांती...

या साडीवर थ्रेड वर्डमधून चिकनकारी केली जाते मग छान जरीकाम केले जाते. या साडीमधील नक्षीकाम पूर्ण करण्यासाठी लागणारे जवळपास सर्वच साहित्य हे जपान मधून मागवले गेले असल्याचे हैदर अली खान यांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर या साडीवर खरे स्वरोवस्की हिरे वापरून नक्षीकाम केले आहे. एवढ्यावरच या साडीची कथा संपत नाही तर... या चमकदार पांढऱ्या रंगाच्या साडीला लखनऊची शाही साडी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ही साडी सजवण्यासाठी यात चिकन पॅटर्नचे एकूण ३२ प्रकारातील टाके मारले आहेत, हे टाके आता काळानुरूप नामशेष झाले आहेत, तर हे टाके मारून करताना येणारे नक्षीकाम करणारे कारागीर हे आता हातांच्या बोटांवर मोजण्या इतकेच राहिले आहेत. या साडीच्या बॉर्डरचीच किंमत सुमारे दोन ते अडीच लाख रुपये इतकी आहे. शिवाय यात अतिशय बारीक चिकनकारी टाके घातले आहेत. 

अनन्या पांडेच्या इटुकल्या पर्सची किंमत ३६ लाखांहून जास्त, ग्लोबल ब्रॅण्डचा नवा भारतीय चेहरा...

या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, ही संपूर्ण साडी म्हणजे एक अद्भुत अनुभवच आहे. ही साडी आपल्याला लखनऊमध्ये कुठेही सापडणार नाही. ही साडी लखनऊच्या हजरतगंजमध्ये असलेल्या अदा डिझायनर चिकनकारी स्टुडिओने तयार केली आहे. अशी साडी तयार करणार्‍या हैदर अली खान यांनी सांगितले की, त्यांना दोन वर्षांपूर्वीच अशी साडी बनवण्याची ऑर्डर आली होती.

Web Title: Sari worth Rs 21 lakhs made with pearls from Japan, real Swarovski turns out to be an eye-catcher.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.