Join us  

वॉशिंग मशीन वापरताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; विजबिल हमखास येईल कमी - होईल पैशांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2024 5:34 PM

Saving Money While Using Your Washing Machine - 4 Tips : विजबिल जास्त येतं म्हणून वॉशिंग मशीन वापरणं टाळता?

एक काळ होता जेव्हा लोक हाताने कपडे धुत असत (Washing Machine). परंतु आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात वॉशिंग मशीन वापरली जात आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्याने वेळेची पुरेपूर बचत होते (Electricity Bill). शिवाय मेहनतही जास्त प्रमाणात लागत नाही. जसे वॉशिंग मशीन वापरण्याचे काही फायदे आहेत (Saving Money). तसे याचे काही तोटे देखील आहेत.

वॉशिंग मशीनचा जास्त प्रमाणात वापर केल्याने वीज बिल जास्त येते. वीज बिल जास्त प्रमाणात आल्यानं बरेच जण कमी प्रमाणात वॉशिंग मशीनचा वापर करतात. पण  दररोज वॉशिंग मशीन वापरुनही वीज बिल कमी येऊ शकतं. यासाठी आपल्याला विशेष टिप्सकडे लक्ष द्यायला हवे. या टिप्समुळे वॉशिंग मशीन वापरुनही वीज बिल जास्त प्रमाणात येणार नाही. शिवाय विजेची बचतही होईल(Saving Money While Using Your Washing Machine - 4 Tips).

टायमर

वॉशिंग मशीन लावताना कमी घाणेरडे कपडे आधी धुवून घ्या. काही कपडे जवळजवळ स्वच्छ असतात. त्यामुळे कपडे लावताना कमी टायमिंग लावा. एकाच वेळी कमी घाण झालेले कपडे धुवून घ्या. यामुळे वीज बिल कमी प्रमाणात येऊ शकते.

कुणाला जिलेबी तर कुणाला लागले ढोकळा खाण्याचे डोहाळे! बॉलीवूड अभिनेत्री सांगतात, गरोदरपणात काय खावेसे वाटले..

पाणी आणि कपडे यांचे प्रमाण

वॉशिंग मशीनमध्ये जास्त प्रमाणात कपडे धुवून घ्या. कपडे धुताना विभागणी करा. वॉशिंग मशीनमध्ये जास्त कपडे धुतल्याने मशीनवर लोड येतो. ज्यामुळे विजबिल जास्त येऊ शकते. अशा स्थितीत कपड्यांचे काही भाग करा, आणि कपडे धुताना त्यात जास्त प्रमाणात पाणी घालू नका.

सामान्य पाणी

कपडे धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर न करता, थंड पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याचा वापर केल्याने यंत्रावर जास्त दबाव येतो. ज्यामुळे विजेचाही वापर जास्त होतो. त्यामुळे थंड पाण्याचाच वापर करा.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

स्पीड

सेटिंगस आणि दिलेल्या माहितीनुसारच कपडे धुताना स्पीड सेट करा. जास्त स्पीड ठेवल्याने बिल जास्त येते, त्यामुळे कपड्यांनुसार स्पीड सेट करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल