Join us  

स्कूलबसच्या दरवाज्यात अडकली चिमुरडी; १ किलोमीटर फरफटत घेऊन गेला ड्रायव्हर, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 4:09 PM

School Bus Viral Video Video : हा व्हिडीओ अमेरिकेतील केंटकी येथील आहे,कोर्टात सुनावणी सुरु झाल्यानं पुन्हा व्हायरल होतो आहे.

अनेकदा अनेक लोक रस्त्यावर हवेत असल्यासारखे  गाडी चालवताना दिसतात. कधी कधी त्यांचा बेफिकीरपणा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरतो. अलीकडे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक स्वतः कधी अपघाताला बळी पडताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्या निष्काळजीपणामुळे इतरांचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. (School bus viral video video of school bus driver dragged the little girl to around 1km viral on social media)

नुकताच एका बसचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये चालकाच्या चुकीमुळे अनेक मुलांचा जीव धोक्यात आला होता. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीसोबत जे घडले ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.सोशल मीडियावर सर्वांचीच झोप उडवणारा हा व्हिडीओ 2015 चा आहे, ज्यात एका चिमुरडीचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे वेदनादायक अपघात झाला आहे.

सुनेला बिकनीत पाहून सासू-सासरे अवाक् झाले; जबदरस्त ट्रांसफॉर्मेशन बघून डोळेच दिपले

हा व्हिडीओ अमेरिकेतील केंटकी येथील आहे, ज्यामध्ये पहिली बस थांबताच मुलगी कशी खाली उतरू लागते हे पाहिले जाऊ शकते. दरम्यान, गेट बंद असताना मुलीची बॅग अडकली. ज्याकडे महिला चालकाचे लक्ष जात नाही आणि त्यामुळे रस्त्यावर धावणारी स्कूल बस चिमुरडीला 1,000 फुटांपेक्षा जास्त खेचते. ही धक्कादायक घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुलीची बॅग गेटमध्ये अडकते, त्यामुळे तीही त्यात अडकते हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान काही अंतरावर गेल्यावर अचानक चालकाची नजर गेटवर पडली असता मुलगी गेटवर अडकल्याचे समजले, त्यानंतर महिला चालकानं ताबडतोब बस थांबवली आणि गेट उघडताच ती मुलाला उचलताना दिसली. 

ही घटना 2015 मध्ये अमेरिकेतील केंटकी येथे घडली होती. मात्र, या घटनेची सुनावणी सुरू होताच ही क्लिप गेल्या वर्षीच प्रसिद्ध झाली. मुलगी त्यावेळी अवघ्या सहा वर्षांची होती आणि जेफरसन काउंटी स्कूल बसमधून उतरत होती. तिला गंभीर मज्जातंतूचे नुकसान झाले आणि PTSD 9 पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर झाला.

नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

हा व्हिडिओ पुन्हा एकदा 'डीन ब्लंडेल' नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 6.2 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'ओएमजी, हे पाहून माझा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये' तिसऱ्याने लिहिले, 'अविश्वसनीय. बाळ ठीक आहे याशिवाय माझ्याकडे आभार मानायला शब्द नाहीत.'

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअपघात