वाहन चालवत असताना अनेकदा चालकाच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर टिका केल्या जातात. खासकरून महिलांना चुकीच्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं. प्रसाशनाकडून वारंवार बजावूनही शिस्तीचं, वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे कधी कधी जीवावरही बेतू शकतं. सोशल मीडियावर अलिकडे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्कूटी चालवताना तोल गेलेली एक तरूणी दाखवण्यात आली आहे. (Scooty girl viral video video of girl colliding with truck parked on road goes viral on social media) काही लोक अगदी विचित्र पद्धतीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्कूटीवर चालणारी एक मुलगी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये शिरताना दिसत आहे.
पापा की परी... pic.twitter.com/icfhzFGoSv
— सुनील पंवार (@Sunilpanwar2507) October 27, 2022
व्हायरल होत असलेल्या या 16 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाचा ट्रक रस्त्याच्या कडेला तिरकस उभा असलेला दिसत आहे. या ट्रकमधून खडे किंवा रेती खाली उतरवली जात असल्याचं दिसून येतं. यादरम्यान तेथून बाहेर पडणारे अनेक दुचाकीस्वार ट्रकच्या पुढे जाऊ लागतात, पण स्कूटी चालवणारी एक मुलगी ट्रकपासून दूर जाण्याऐवजी स्कूटी पुढे लावते. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्समध्ये हशा पिकला आहे.
चोर तर चोर आणि वर शिरजोर! लॅपटॉप चोरुन Email पाठवला; 'भावा, काल तुझा लॅपटॉप चोरला'
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Papas angel'. या व्हिडिओला आतापर्यंत 45.5 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाइक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'सगळी चूक ट्रक ड्रायव्हरची आहे.'