घराची साफ-सफाई हा (Home Cleaning Hacks) रोजच्या कामाचा एक भाग आहे. (Kitchen Tips) घरात जर साफ-सफाई नसेल तर काहीच करण्यात मन लागत नाही. किचन साफ-स्वच्छ असेल तर घर स्वच्छ दिसण्यास मदत होते. अशावेळी खोलीपासून, किचन-वॉशरूमपर्यंत प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवावा लागतो. (How To Clean Home Faster) ऊन्हाळ्याच्या दिवसांत हे काम करणं कोणत्याही टास्कपेक्षा कमी नसते. तुम्हाला जास्त टेंशन घेण्याची काही आवश्यकता नाही. घरच्याघरी सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही किचनची साफ-सफाई करू शकता. (Home Cleaning Hacks)
होम स्टोलव्हच्या रिपोर्टनुसार किचन स्वच्छ करण्यासाठी ८ मिनिटांचा वेळ द्या, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी ५ मिनिटं तर बेडरूम स्वच्छ करण्यासाठी ५ मिनिटंचा वेळ द्या, संपूर्ण घराची फरशी क्लिन करण्याासाठी १० ते १५ मिनिटं वेळ द्या. घराच्या आकारानुसार वेळ कमी जास्त होऊ शकतो पण या पद्धतीने वेळेत घरातली कामं पूर्ण होतील.
1) साफ-सफाई करण्याची १ योजना बनवा
आठवड्यातून १ किंवा २ दिवस साफ-सफाईसाठी राखून ठेवा. सगळ्यात आधी तुम्हाला कोणकोणती काम करायची आहेत याची योजना तयार करा आणि त्या क्रमानुसार काम करा. कारण एकत्र साफ सफाई केल्यास काम अपूर्ण अर्धवट राहू शकते. म्हणून काम पूर्ण करण्यासाठी स्टेप बाय स्टेप करा.
2) छोट्या-छोट्या जागा आधी स्वच्छ करा
मोठ्या कामांसाठी साफ-सफाई करणं कठीण होतं. अशा स्थितीत तुम्ही मोठे टास्क छोट्या कामांमध्ये वाटू शकता. तुम्हाला घराची साफ-सफाई करायची असेल तर आधी अंथरूण व्यवस्थित करा. त्यानंतर कपाटातील वस्तू व्यवस्थित ठेवा. नंतर फरशी स्वच्छ करा.
3) लवकरात लवकर काम करा
काम करताना सुस्ती येत असेल लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यानंतर लवकर काम आवरून घ्या. ज्यामुळे तुम्हाला घाम कमी येईल आणि थकवासुद्धा जाणवणार नाही. कामात बोअरिंग वाटणार नाही.
4) स्वयंपाक करताना जास्त पसारा नको
जेवण बनवल्यानंतर किंवा जेवण बनवताना लगेच गॅस ओटा किचन काऊंटर स्वच्छ करा. भांडी धुण्यात निष्काळजीपणा केल्यास तुमचा सर्वाधिक वेळ जाऊ शकतो. म्हणून काम पेंडीग ठेवू नका.