'मोस्ट रोमॅंटिक हिरो' ही शाहरुख खानची ओळख. त्याच्यासारखा हळूवार रोमान्स कोणत्याच अभिनेत्याला जमत नाही. त्याच्या रोमॅण्टिकपणाची तऱ्हाच न्यारी आहे. पण रोमान्स, तिला स्पेशल वाटणं, आदर देणं आणि सभ्य असणं हे करताना आपला आबही राखणं हे सारं शाहरुख कसं जमवतो? त्याच्या दृष्टीने खरा मर्द कोण आणि खरी मर्दानगी कशात आहे, याविषयीचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो जे सांगतो ते खरंच आचरणात आणावं असं आहे.
शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा छाेटासा भाग व्हायरल आहे. त्यात त्याने तो महिलांचा सन्मान कसा करतो, कोणत्या गोष्टी स्त्रियांसाठी आवर्जून करतो आणि कोणत्या कटाक्षाने टाळतो, शाहरुख म्हणतो, 'लेडिज फर्स्ट' हे तुमच्या वागण्याबोलण्यातून दिसलं पाहिजे.
खाऊन पाहिलं कधी पेरुचं भरीत? बघा ही भन्नाट रेसिपी, एकदम खमंग- चटकदार
त्यात आदर हवा. कारमधून उतरताना तुम्ही तिच्यासाठी दवाजा उघडता का? जेवणाच्या टेबलवर ती बसल्यावरच तुम्ही खुर्चीत बसता का? ती कुणीही असो, आई, पत्नी, मुलगी, सहकारी, मैत्रीण तुम्ही किती आदरानं वागता यावर अनेक गोष्टी ठरतात. ॲग्रेसिव्हनेस मी टाळतो. कायमच. कधी चुकून थट्टा केलीच तर लगेच माफीही मागतो.
मुलांनी पेन्सिलीने, रंगांनी लिहून खराब केलेली भिंत होईल चकाचक, फक्त 'हा' १ पदार्थ लावा..
चुकून कधी मी महिलांशी गैरवर्तन करत नाही. मला वाटतं प्रत्येक पुरुषात स्त्रीत्व असतं, ते जाणवलं की जगण्याचा पोत बदलतो. आपण अधिक संवेदनशील होतो. आणि ज्याला हे जमतं तोच खरा 'मर्द' आणि तिच त्याची खरी 'मर्दानगी'.
सन्मान देणं आणि सन्मानानं वागणं याची परीभाषाच शाहरुख खान सांगतो. आदरानं इतरांना वागवणं हे मूल्य कोणत्याही काळात फार महत्त्वाचं.