Join us  

१ रुपयाचा शाम्पू घ्या आणि चकचकीत करा तुमचे बाथरूम - बेसिन आणि गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 4:18 PM

Shampoo an effective bathroom cleaner : बाथरूम अस्वच्छ - घाण दिसते? महागडे प्रॉडक्ट्स सोडा, एक रुपयाच्या शाम्पूने क्लिन करा

सणवार जवळ आले की आपण घर साफ करण्याच्या तयारीला लागतो. घरातील प्रत्येक कोपरा साफ करतो. मग शेवटी बाथरूम साफ करतो. बाथरूम साफ करणे हे खरंच एक वेळखाऊ काम आहे. अनेकदा बाथरूम लवकर साफ होत नाही. बाथरूमच्या टाईल्सवरील हट्टी डाग काही केल्या निघत नाही.

अनेकदा आपण महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करून बाथरूम साफ करतो. पण काही वेळेला हे प्रॉडक्ट्स देखील फेल ठरतात. जर आपल्याला महागडे प्रॉडक्ट्सशिवाय बाथरूम साफ करायचं असेल तर, एक रुपयाच्या शाम्पूच्या पुडीने साफ करा. शाम्पूच्या वापराने बाथरूममधील हट्टी डाग लवकर निघून जातील, व बाथरूमवरील टाईल्स चकाचक चमकतील(Shampoo an effective bathroom cleaner).

बाथरूम ग्लास

बाथरूमच्या काचा लवकर घाण होतात. यासाठी शाम्पूचा वापर करून क्लीनर तयार करा. यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात शाम्पू घालून मिक्स करा. नंतर त्यात ३ ते ४ चमचे व्हिनेगर घाला. नंतर चमच्याने सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. तयार क्लीनर बाथरूमच्या काचांवर लावा, त्यानंतर टिश्यू पेपरने पुसून काढा. यामुळे बाथरूमच्या काचा लवकर साफ होतील.

पहिलं लग्न मोडलं, पदरात मुलगा, डिप्रेशन-अफेअरचे गॉसिप, वाचा स्टारडमपलिकडची माहिरा खानची एकाकी कहाणी

बाथरूम फ्लोर

आपण शाम्पूच्या मदतीने बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करू शकता. यासाठी एक कप कोमट पाण्यात शाम्पू मिक्स करा. त्यानंतर त्यात २ चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार लिक्विड बाथरूमच्या टाईल्सवर टाका. नंतर स्क्रबरने टाईल्स घासून काढा. या ट्रिकमुळे टाईल्स काही मिनिटात क्लिन होतील.

भांडी घासण्याचा साबण लवकर संपतो, विरघळून चिखल होतो? १ ट्रिक-साबण लवकर संपणार नाही

वॉश बेसिन

वॉश बेसिन साफ करण्यासाठी आपण शाम्पूचा वापर करू शकता. यासाठी एका कपमध्ये पाणी घ्या, त्यात शम्पू आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार लिक्विड वॉश बेसिनमध्ये शिंपडा. नंतर स्क्रबरने वॉश बेसिन घासून काढा. यामुळे वॉश बेसिन काही मिनिटात चकाचक होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल