Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली? २ सोप्या ट्रिक्स; मिक्सरमध्ये वाटण होईल छान

मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली? २ सोप्या ट्रिक्स; मिक्सरमध्ये वाटण होईल छान

Sharpen mixer grinder blades within 1 minute in your kitchen : नवीन मिक्सरचं भांडं घेण्यापेक्षा, जुन्या भांड्याला 'या' सोप्या पद्धतीने धार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 12:39 PM2024-06-27T12:39:53+5:302024-06-27T12:41:10+5:30

Sharpen mixer grinder blades within 1 minute in your kitchen : नवीन मिक्सरचं भांडं घेण्यापेक्षा, जुन्या भांड्याला 'या' सोप्या पद्धतीने धार लावा

Sharpen mixer grinder blades within 1 minute in your kitchen | मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली? २ सोप्या ट्रिक्स; मिक्सरमध्ये वाटण होईल छान

मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली? २ सोप्या ट्रिक्स; मिक्सरमध्ये वाटण होईल छान

मिक्सरचा वापर प्रत्येक घरात होतो. ही अत्यंत उपयुक्त वस्तू आहे (Mixer Grinder). झटकन मिक्सर फिरवलं तर, आपल्याला पाहिजे तो पदार्थ झटकन बारीक किंवा पेस्ट तयार होते. पूर्वी पाटा वरवंटाचा वापर लोक करीत असे (Sharpening). पण मिक्सरने पाटा वरवंट्याची जागा घेतली (Kitchen Tips). मिक्सरचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण मिक्सरचं भांडं हे एकच प्रकारचे असते.

रोजच्या वापरामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कमी होतो. ज्यामुळे पदार्थ व्यवस्थितरित्या बारीक होत नाही, किंवा त्याची पेस्ट होत नाही. अशावेळी आपण नवीन मिक्सरचं भांडं विकत घेतो. पण नवीन मिक्सरचं भांडं विकत घेण्यापेक्षा आपण घरातच मिक्सर भांड्याच्या ब्लेडलाही धार लावू शकता(Sharpen mixer grinder blades within 1 minute in your kitchen).

मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड धारदार करण्याची पद्धत

- मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला धार देण्यासाठी आपण सँडपेपरचा वापर करू शकता. सँडपेपर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात १० ते २० रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

- सँडपेपरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी, मिक्सर ग्राइंडरमधून ब्लेड बाहेर काढा.

पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब

- ब्लेड काढल्यानंतर सँडपेपरने घासून घ्या.

- सँडपेपरने घासत असताना, त्यावर पाण्याचे थेंब टाकत राहा, आणि घासत राहा. जेणेकरून ब्लेडला धार येईल.

ब्लेड धारदार करण्याचे इतर उपाय

- जर आपल्याला सँडपेपर वापरायचा नसेल तर, प्युमिस स्टोन, ॲल्युमिनियम फॉइल किंवा लोखंडी रॉडचा वापर करून पाहा. यामुळे ब्लेडला सोपी पद्धतीने धार येईल.

भिजवलेले १० बदाम रोज सकाळी खाण्याचे पाहा फायदे,वजन घटवा-मेंदूही होतो तल्लख

ब्लेडला धार देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

- मिक्सरच्या ब्लेडला सँडपेपरने किंवा इतर कोणत्याही प्रकारे धार लावत असाल, तर हातमोजे नक्कीच घाला.

- ब्लेडला धार देताना कोमट पाण्याचा वापर करा. पाण्यात एक किंवा दोन चमचे मीठ घाला. यामुळे ब्लेडला धार देणे सोपे होईल. 

Web Title: Sharpen mixer grinder blades within 1 minute in your kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.