आई होण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तब्बल ९ महिने वेदना सहन करून आई बाळाला जन्म देते. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, एका महिलेला ती गर्भवती आहे हेच माहीत नव्हते. विमान प्रवासात अचानक तिचे पोट दुखू लागले आणि टॉयलेटला गेली असता प्रसूती वेदनाच सुरु झाल्या. प्रवाशांमध्ये दोन डॉक्टर होते, त्यांच्या मदतीने तिची प्रसूती झाली. तमारा असे तिचे नाव. #KLM फ्लाइटने ती प्रवास करत होती. जेव्हा ती पोटात दुखतंय म्हणून टॉयलेटमध्ये गेली आणि तिला भलतंच सरप्राइज मिळालं. (She gave birth to a baby in the airplane toilet)
KLM रॉयल डच एअरलाईनच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पोटात वेदना जाणवल्यानं ती विमानाच्या टॉयलेटमध्ये गेली आणि एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे प्रवाश्यांप्रमाणेच आईसाठीही तितकेच आश्चर्यकारक होते कारण तिला आपण प्रेग्नंट असल्याची कल्पनाच नव्हती. या विमानात सुदैवानं २ डॉक्टर प्रवास करत होते. त्यामुळे महिलेची प्रसुती व्यवस्थित झाली.
हृदयस्पर्शी! अंध आई-वडिलांना जेवण भरवणारी लेक पाहून लोकांना आठवला श्रावणबाळ, पाहा व्हिडिओ
तमारा ही गायुहक्वील-इक्वेडोर ते अॅमेस्टरडॅम प्रवास करत असताना विमान अर्ध्यावर पोहोचल्यावर तिला प्रसृती कळा सुरू झाल्या. यावेळी नेमके या विमानात दोन डॉक्टर आणि नर्स उपस्थित होते. प्रसंग लक्षात घेता त्यांनी या महिलेची प्रसृती व्यवस्थित पार पाडली. या महिलेला आपण प्रेग्नंट आहोत हेच माहीत नसल्यानं विमान कंपन्यासाठीही ही घटना आश्चर्यकारक होती.