द न्यू यॉर्क पोस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार बेकी बेकमैन हे अमेरिकेत राहणारं एक जोडपं.. त्यांच्या वॉशरुममधून मागच्या अनेक वर्षांपासून खूपच वेगवेगळे, विचित्र आवाज यायचे. त्यांना वाटायचं की काहीतरी पाणी वाहून जाण्याचा प्रॉब्लेम होत असावा, त्यामुळे असे आवाज येत असतील.. अशी स्वत:ची समजूत घालत त्यांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्र त्या आवाजामागचं खरं रहस्य समजलं आणि पती- पत्नी दोघेही हैराण झाले...(women lost her mobile 10 years ago)
त्याचं झालं असं की जेव्हा त्यांच्या वॉशरूममधून (weird sound from washroom) येणाऱ्या आवाजाची तिव्रता वाढू लागली, तेव्हा त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यायचं ठरवलं. कारण तो आवाज आता जास्तच भितीदायक आणि मोठा झाला होता. त्यामुळे वॉशरुममध्ये जाण्याचीही भीती वाटू लागली होती. त्यामुळे बेकी यांच्या पतीने जेव्हा वॉशरुममध्ये जाऊन आवाजाचा शोध घेतला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...
कारण हा आवाज येत होता तो तब्बल १० वर्षांपुर्वी त्यांच्या वॉशरुममध्ये पडलेल्या मोबाईलचा. २०१२ साली हॅलोविनची रात्र होती. त्या रात्री बेकी यांचा मोबाईल हरवला. त्या त्या दिवशी घरातच होत्या. घरात बाहेरची कुणी व्यक्तीही आलेली नव्हती.. त्यामुळे त्यांनी घरात पुढील ४- ५ दिवस मोबाईलचा खूप शोध घेतला. पण मोबाईल काही सापडेना.. आपण घरीच असताना, दरवाजे बंद असताना मोबाईल गायब कसा झाला, हे कळेचना. काही दिवसांनी त्यांनी मोबाईलचा शोध थांबवला आणि अखेरीस नवा मोबाईल घेऊन् टाकला. हरवलेला मोबाईल वॉशरुमच्या पाईपमध्ये अडकला होता आणि एक- दोन नाही तर तब्बल १० वर्षे तो तिथेच होता, याचं आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. मोबाईल तर खराब झालाच होता, पण त्याची बॅटरी आणि अन्य भागांमध्ये पाणी गेल्याने तो विशिष्ट आवाज येत होता, असं बेकी यांनी द न्यू यॉर्क पोस्ट यांना माहिती देताना सांगितलं.