Lokmat Sakhi >Social Viral > ‘तिने’ स्टेजवर हुबेहुब साकारले प्राणी, बदलले रुप! तरुणीचे अफाट टॅलण्ट, अशी कला पाहिली नसेल..पाहा व्हिडिओ

‘तिने’ स्टेजवर हुबेहुब साकारले प्राणी, बदलले रुप! तरुणीचे अफाट टॅलण्ट, अशी कला पाहिली नसेल..पाहा व्हिडिओ

Social Viral Video काय अफाट टॅलण्ट असं हा व्हिडिओपाहून नक्की वाटेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 07:21 PM2022-12-09T19:21:50+5:302022-12-09T19:22:57+5:30

Social Viral Video काय अफाट टॅलण्ट असं हा व्हिडिओपाहून नक्की वाटेल!

'She' played the animal on stage, changed form! Immense talent of the young lady, I have not seen such art.. Watch the video | ‘तिने’ स्टेजवर हुबेहुब साकारले प्राणी, बदलले रुप! तरुणीचे अफाट टॅलण्ट, अशी कला पाहिली नसेल..पाहा व्हिडिओ

‘तिने’ स्टेजवर हुबेहुब साकारले प्राणी, बदलले रुप! तरुणीचे अफाट टॅलण्ट, अशी कला पाहिली नसेल..पाहा व्हिडिओ

इंटरनेट हे एक असं माध्यम बनलं आहे, जिथे कलेला योग्य वाव मिळतो. टॅलंट असेल तर व्यक्ती रातोरात प्रकाशझोतात येते. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका ‘टॅलेंट हंट शो’मधील असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही प्राणी आणि पक्षी दिसत आहेत. पण हे प्राणी, पक्षी नसून एका महिलेने ते रूप साकारलेले आहे. या व्हिडिओला "फ्रायडे इन द फॉरेस्ट" असे कॅप्शन देण्यात आले आहे.

व्हिडीओच्या सुरूवातीला एक घुबड स्टेजवर बसलेले दिसत आहे. पण काही सेकंदातच हे घुबड नसून एका महिलेने हे रूप साकारले असल्याचे स्पष्ट होते, अशाप्रकारे अनेक प्राणी या स्टेजवर हुबेहुब साकारण्यात आले आहेत. जस जसे ती व्यक्ती आपले हात आणि पाय वळवते तस तसे विविध प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. काही सेकंदातच ती अख्खं प्राणीसंग्रहालय स्टेजवर आणते.
हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून, अनेकांनी कमेंट करत या कौशल्याचे कौतुक केले आहे.

Web Title: 'She' played the animal on stage, changed form! Immense talent of the young lady, I have not seen such art.. Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.