Join us  

ती म्हणते आईवडिलांचे पैसे खर्च करणं हाच माझा जॉब! दिवसाला उडवते ४० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2022 5:19 PM

वयाच्या २६ व्या वर्षी बघा एवढ्या पैशांचं ही मुलगी नेमकं करते तरी काय

ठळक मुद्देखरेदीसाठी बाहेर पडणे, पार्लरच्या ट्रीटमेंट, फिटनेससाठी व्यायाम, महागडे खाणे आणि सोशल मीडियावर वेळ घालवणे हाच तिचा दिनक्रम आहे.तिचे आई-वडिल नेमके काय करतात याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

कोणी पैसे खर्च करताना खूप जास्त विचार करतात आणि भविष्यासाठी पैसे साठवून ठेवतात. तर काही जण पैसे खर्च करताना अजिबात विचार करत नाहीत. आता तेही स्वत: कमावलेले पैसे असतील तर ठिक आहे. पण आई-वडिलांनी कमावलेल्या पैशांवर मजा करणारी मुले तर अनेकदा आपल्या आई-वडिलांना हे पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याचाही विचार करत नाहीत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी लाखो रुपये दिवसाला खर्च करत असल्याचे दिसते. रोमा अब्देसेल्लम (Roma Abdesselam) असं या तरुणीचं नाव असून ती ती न्यूयॉर्कमध्ये राहते. पेशाने टिकटॉकर असलेली रोमा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे.  

(Image : Google)

आता रोज लाखो रुपये उडवते म्हणजे त्या पैशांचे ती काय करते असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर तिने स्वत:च दिलेल्या माहितीनुसार, ती स्टे इन होम डॉटर आहे. म्हणजेच ती शिक्षण, नोकरी न करता घरात राहणारी मुलगी आहे. आई-वडिलांचे पैसे खर्च करणे हेच आपले पूर्णवेळाचे काम आहे असंही ती म्हणते. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन आपल्याला तिच्या लाईफस्टाईलचा अंदाज येऊ शकतो. दररोज एक दोन नाही तर चक्क ४० लाख रुपयांची खरेदी करत ती हे पैसे खर्च करते. यामध्ये कपडे, दागिने, चपला, बॅग अशा काही ना काही वस्तू ती घेते. इतकेच नाही तर ती पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटवरही लाखो रुपये खर्च करत असल्याचे तिने माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. इतकेच नाही तर खूप महागडे पदार्थ खाण्यातही ती बरेच पैसे खर्च करत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. 

(Image : Google)

अवघ्या २६ वर्षांची असलेली रोमा उशीरा झोपेतून उठते. त्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडणे, पार्लरच्या ट्रीटमेंट, फिटनेससाठी व्यायाम, खाणे आणि सोशल मीडियावर वेळ घालवणे हाच तिचा दिनक्रम आहे. ही मुलगी एकदा वापरलेले कपडे पुन्हा घालत नाही. तर एकदा वापरुन ते कपडे ती गरजू लोकांना दान म्हणून देते. आता तिच्याकडे इतके पैसे कसे येतात. तिचे आई-वडिल नेमके काय करतात याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र तिच्या या खर्चावर तिच्या आईवडिलांचे काही नियंत्रण नाही का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसत आहे. आपले पालक आपल्याला नोकरी करण्यासाठी मागे लागल्याचे ती म्हणते. इतकेच नाही तर लग्नासाठीही ते आपल्या मागे लागल्याचे ती सांगते. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया