आपण मोबाईल फोन, समाज, मित्र परिवार याच्या आहारी इतकं गेलो आहोत की, त्यांच्याशिवाय एक दिवस काढणे अशक्य आहे. पण एका महिलेने चक्क या गोष्टींना राम - राम ठोकत ५०० दिवस एका गुहेत काढले आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, ही महिला आहे मुळची स्पेन येथील रहिवाशी. तिने तिचं कुटुंब, मित्र, समाज, या सर्वांपासून दूर एका निर्जन गुहेत एकटीने ५०० दिवस काढले. नुकतीच ही महिला गुहेतून बाहेर आली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बीट्रिझ फ्लॅमिनी असे या महिलेचे नाव आहे. त्या गिर्यारोहक असून, त्या ४८ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी या संशोधनासाठी गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. फ्लॅमिनी मानवी प्रयोगासाठी ७० मीटर खोल गुहेत राहत होती. २० नोव्हेंबर २०२१ ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत, त्या ग्रॅनडातील २३० फूट खोल गुहेत राहिल्या. सुमारे दीड वर्षानंतर त्या या गुहेतून बाहेर आल्या. या काळात त्यांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला. फ्लॅमिनीने बाहेर पडताना चष्मा घातलेला होता, कारण तिला सूर्यप्रकाशचा त्रास झाला असता(A Spanish athlete spent 500 days alone in a cave. She did not want to get out).
फ्लॅमिनी वैज्ञानिक प्रयोगासाठी गेली गुहेत
बाहेर पडताच फ्लॅमिनी म्हणाली, ''जेव्हा लोकं मला न्यायला आली, तेव्हा मी झोपलेले होते. मला वाटलं काहीतरी नक्कीच झालं आहे. मी त्यांना म्हणाले की, एवढ्या लवकर निश्चित मला तुम्ही न्यायला येणार नाही, काही तरी कारण आहे. व माझे पुस्तक देखील लिहून झालेले नाही''. त्यानंतर फ्लॅमिनीच्या सपोर्ट टीमने सांगितले की, ''प्रयोगादरम्यान गुहेत सर्वाधिक काळ राहण्याचा विश्वविक्रम त्यांनी मोडला आहे''. खरं तर, फ्लॅमिनी शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली मानवी मन आणि सर्केडियन रिदमचा अभ्यास करण्यासाठी गुहेत गेली होती. याच दरम्यान त्यांनी एक पुस्तकही लिहायला सुरुवात केलं.
भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..
गुहेत त्यांनी दोन वाढदिवस केले साजरे
शनिवार 20 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी आपला आव्हानात्मक प्रवास सुरू केला. यादरम्यान, त्यांनी आपले दोन वाढदिवस गुहेतच साजरे केले. बीट्रिझने गुहेत राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय जिवंत होत्या. रशिया-युक्रेन युद्धही सुरू झालं नव्हतं. कोरोनाने जगावर कहर केला होता. त्यामुळे गुहेतून बाहेर आल्यानंतर बीट्रिझ यांना जग बदलल्यासारखे वाटत होते.
गुहेत राहून बीट्रिझ यांनी घालवला क्वालिटी वेळ
बीट्रिझ यांनी त्यांचा बराचसा वेळ गुहेत व्यायाम करण्यात घालवला. याशिवाय त्या पेंटिंग, कपडे विणायच्या आणि पुस्तके वाचायच्या. या ५०० दिवसांत बीट्रिझने सुमारे १००० लिटर पाणी प्यायले. पण, तिला आंघोळ करता आली नाही. बाहेर येताना बीट्रिझ म्हणाल्या- गुहेत राहून त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. कधीकधी भीती वाटली, पण मी हिम्मत सोडली नाही. मी मनातल्या मनात खूप काही बोलले. त्या एका राऊटरच्या मदतीने स्वतःच्या हालचाली व्हिडिओद्वारे पाठवायच्या.
पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?
गुहेत जाण्यामागे हेतू काय?
काही मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि गुहांवर संशोधन करणारे लोक एकत्र अभ्यास करत होते. ज्याचा उद्देश मानवी शरीर आणि मेंदूच्या क्षमता जाणून घेणे हा होता. निर्जन ठिकाणी एकटे राहिल्याने माणसाच्या शरीरात आणि हावभावांमध्ये बदल होतो का? दैनंदिन गोष्टी सोडल्याने नक्की काय होते? हे अभ्यासातून त्यांना शोधायचे होते. त्यासाठी बीट्रिझने गुहेत राहण्याचे मान्य केले. आता तिची तपासणी करून या अभ्यासाचा निष्कर्ष काढण्यात येणार आहे.