'सून करावी गरिबाघरची आणि मुलगी द्यावी श्रीमंताघरी...' ही पद्धत आपल्याकडे फार पुर्वीपासून चालत आलेली आहे. याच उक्तीनुसार अजूनही कोणताही बाप त्याच्या लेकीसाठी स्वत:च्या आर्थिक परिस्थितीपेक्षा उत्तम परिस्थिती असणारेच सासर शोधतो. आपल्या मुलीने आपल्यापेक्षा चांगल्या घरात जावे, तिथे तिला माहेरपेक्षा जास्त सुख मिळावे, असं कोणत्याही आई- वडिलांना वाटणे साहजिकच आहे. शिल्पा शेट्टीनेही हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त हे ती थोड्या वेगळ्या भाषेत सांगते आहे (Shilpa Shetty about her marriage to Raj Kundra). जर मुलींनी त्यांच्यापेक्षा श्रीमंत मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचं काय चुकलं असा सरळ प्रश्नच तिने विचारला. (Shilpa Shetty's opinion about marrying rich person )
राज कुंद्राकडे खूप पैसा आहे, त्या पैशांमुळेच शिल्पा शेट्टीने त्याच्याशी लग्न केलं, असं शिल्पाबाबत बऱ्याचदा बोललं जातं. यावर शिल्पाने अतिशय सडेतोड उत्तर दिलं आहे. shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवरून शिल्पा शेट्टीच्या मुलाखतीचा छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे.
घरात भाजी नसल्यास फक्त १ कांदा घेऊन करा झणझणीत चटणी- कुणाल कपूर स्पेशल रेसिपी
यामध्ये शिल्पा म्हणजे की जेव्हा आमचं लग्न ठरलं, तेव्हा सगळ्यांनी राज किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, याचा शोध गुगलवर घेतला. पण त्यावेळी कोणीच हे पाहिलं नाही की मी पण किती श्रीमंत आहे, माझ्याकडेही पैसा आहे.
मी पण तेव्हा श्रीमंतच होते, यशस्वी होते आणि आताही आहेच. पण तरीही जेव्हा माझं त्याच्याशी लग्न ठरलं तेव्हा मी आतापर्यंत काय कमावलं, काय मिळवलं हे न पाहताच लोकांनी त्याचा पैसा, त्याची श्रीमंती मोजायला सुरुवात केली.
श्रीमंत नवरा जर एखादीला मिळाला तर लोक आतापर्यंत तिने मिळवलेलं यश, पैसा का बघत नाहीत? कोणत्याही मुलीने असाच नवरा बघावा जो तिच्या यशामुळे स्वत:ला कमी लेखणार नाही. किंवा तिचं यश, तिचा पैसा त्याच्या डोळ्यात खुपणार नाही. तिच्या लाईफस्टाईलचा खर्च जो पेलू शकेल, असाच नवरा बघावा. अन्यथा तुमच्या संसाराची कथाही 'अभिमान' चित्रपटासारखी होण्यास वेळ लागणार नाही, असंही ती स्पष्टच बोलली.