Lokmat Sakhi >Social Viral > मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम तर झाला नाही ना, करा शिल्पा शेट्टी करते तसा नेत्र योग

मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम तर झाला नाही ना, करा शिल्पा शेट्टी करते तसा नेत्र योग

Excess Use of Screen Eye Yoga स्क्रीनमुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होतो, याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यासाठी नेत्र योग करणे उत्तम ठरेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 04:13 PM2022-11-08T16:13:05+5:302022-11-08T16:15:45+5:30

Excess Use of Screen Eye Yoga स्क्रीनमुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होतो, याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यासाठी नेत्र योग करणे उत्तम ठरेल 

Shilpa Shetty Shares Her Eye Cleansing Routine In A New Video, Says Eyes Are “A Gift We Should Never Take For Granted” | मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम तर झाला नाही ना, करा शिल्पा शेट्टी करते तसा नेत्र योग

मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम तर झाला नाही ना, करा शिल्पा शेट्टी करते तसा नेत्र योग

बाॅलिवूड सिनेसृष्टीतील फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी तिच्या विविध योगासनामुळे चर्चेत असते. ती सोशल मिडीयावर योग करत असतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर नेत्र योगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नेत्रांसंबंधित माहिती देताना दिसून येते. सतत स्क्रीन समोर असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील सांगताना दिसून येत आहे. आपण शरीराची उत्तमरित्या काळजी घेत असतो. मात्र, बहुतांशवेळा डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतो. सध्याच्या जीवनात मोबाईल, लॅपटॉप आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. कोरडा डोळा देखील यापैकी एक आहे. लोकांना कळत नाही पण हळूहळू हा त्रास मोठा आजार होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती अतिशय सहज नेत्र मुद्रा करताना दिसत आहे. आपणही मुद्रा घरच्या घरी करून पाहू शकता.

स्क्रीनमुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होतो

स्क्रीनमुळे डोळ्यांना फार इजा पोहचते. याविषयी एक व्हिडिओ पोस्ट करत शिल्पा शेट्टीने लिहिले की, “मी नुकतेच कुठेतरी वाचले की सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात. याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असेही म्हणतात. हे वाचून मी खरंच अस्वस्थ झाले. तंत्रज्ञानापासून आपण लांब जाऊ शकत नाही, परंतु आपण आपल्या डोळ्यांची चांगली काळजी नक्कीच घेऊ शकतो”. शिल्पाने व्हिडिओमध्ये नेत्र योग कसा करायचा हे सांगितले आहे.

डोळे संरक्षित करण्याचे नैसर्गिक मार्ग

शिल्पा म्हणते, आपले डोळे आपल्या आत्म्याचा आरसा आहे. आपण आपला आत्मा कसा स्वच्छ ठेवू शकतो ते शिका. कोरड्या डोळ्यांच्या समस्येवर आराम देण्यासाठी आर्टिफिशियल टियर ड्रॉप बाजारात येतात. शिल्पा शेट्टीने डोळ्यांना नैसर्गिक पद्धतीने वंगण ठेवायला शिकवले असले तरी आपण गरज असल्यास हे ड्रॉप वापरू शकता.

असा करा व्यायाम

शिल्पाने व्हिडिओमध्ये नेत्र योग कश्यापद्धतीने करायचा हे दाखवले, सर्वप्रथम सरळ बसा आणि उजवीकडे आणि डावीकडे डोळे वळवून पहा. मग घड्याळाच्या दिशेने फिरवा मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग वर खाली पहा. आपले डोळे बंद करा आणि नंतर त्यांना सोडा. थोडा वेळ हे करा. आपले डोळे जोरदारपणे मिचकावा आणि नंतर काही काळ बंद करा. असे केल्याने डोळे कोरडे होणार नाहीत.

कोरड्या डोळ्याची 'ही' आहेत लक्षणे

डोळ्यांत सुईसारख टोचणे, जळजळ, डोळे लाल किंवा अश्रू येत असतील, जळजळ होत असेल, तर, डोळ्यांत कोरडेपणा येत आहे, असे समजावे. ही सर्व लक्षणे दिसत नसली तरी हा नेत्र योग करत राहणे फायदेशीर ठरते.

Web Title: Shilpa Shetty Shares Her Eye Cleansing Routine In A New Video, Says Eyes Are “A Gift We Should Never Take For Granted”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.