मागील काही महिन्यांपासून सिक्विन साड्यांचा ट्रेण्ड खूपच इन आहे. या साड्यांची नजाकत, त्यांचं सौंदर्य आणि या साड्यांमध्ये असणारी एक वेगळीच स्टाईल यामुळे सिक्विन साड्या खूपच हिट ठरल्या आहेत. बी टाऊनमधील अभिनेत्रींचं तर सिक्विन साड्यांवर विशेष प्रेम असलेलं दिसून येतं. म्हणूनच तर आलिया भटपासून (Alia Bhat) ते मलायका अरोरापर्यंत (Malaika Arora) अनेक अभिनेत्रींचे सिक्विन साडी लूक सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (social viral) झाले असून त्यांना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
बॉलीवूडची फिटनेस फ्रिक (fitness freak) अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील याबाबतीत मागे नाही. शिल्पा शेट्टीने सिक्विन साडीतले तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले असून ते सध्या सोशल मिडियावर (social media) जबरदस्त व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये शिल्पाने जी साडी नेसली आहे, ती वाईन रेड रंगाची असून सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांच्या कलेक्शनमधली आहे. शिल्पाच्या चाहत्यांना ती खूपच आवडली आहे, असे तिला मिळालेल्या कमेंटमधून दिसून येते.
मनिष मल्होत्रा यांनी देखील शिल्पाचे सिक्विन साडीतले फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले असून ''Sparkly and Glamorous, our signature popular sequin saree ..'' अशा शब्दांत साडीचे वर्णन केले आहे. सिक्विन साडीचा ट्रेण्ड सेलिब्रिटी फॅशन वर्ल्डमध्ये आणण्याचे श्रेय मनिष मल्होत्रा आणि सब्यासाची (Sabyasachi) या दोन सेलिब्रिटी डिझायनरला जाते हे खरेच.. या दोघांनीही या साडीवर काम करून तिचे सौंदर्य आणखीनच खुलविले आहे. सिक्विन साडीच एवढी कॅची लूक देणारी आणि चमचमती असते. की ती साडी नेसल्यावर खूप हेवी दागिने घालण्याची अजिबातच गरज नसते. त्यानुसार शिल्पाने एका हातात ब्रेसलेट आणि मोठे कानातले एवढेच दागिने घातले आहेत, तरीही ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
शिल्पाचा लूक अतिशय बोल्ड ॲण्ड स्टनिंग झाला आहे. तिची साडी आणि मेकअप तर आकर्षक आहेच, पण त्यापेक्षाही अधिक लक्षवेधी दिसत आहे ते तिचे ब्लाऊज. साडीचा पदर जेवढा लांब आहे, तेवढ्याच लांब किंवा त्यापेक्षाही अधिक लांब शिल्पाच्या ब्लाऊजच्या (blouse fashion) बाह्या आहेत. अगदी दोन्ही बाह्यांना ओढणी लावलेली असावी, असा लूक या ब्लाऊजचा आहे. पदरापेक्षाही लांब बाह्या असणारी ही कोणती स्टाईल, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.