सोशल मिडियावर नेहमीच खूप वेगवेगळे रिल्स, व्हिडिओ बघायला मिळतात. त्यातले काही व्हिडिओ (viral video of a young man while driving two wheeler) आपल्याला खरोखरच थक्क करून सोडणारे असतात. सध्या व्हायरल झालेला हा एक व्हिडिओही असाच आहे. हा व्हिडिओ पाहून या माणसाला स्वत:च्या आणि स्वत:च्या बायकोच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही, असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. कारण दुचाकी चालवताना त्याने जे काही केलंय ते पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.
आपल्या शहरात आपण अशा प्रकारची तरुण मंडळी अनेक पाहतो. हे लोक एकतर आपल्याच धुंदीत सुसाट गाडी चालवत असतात. आजूबाजूचे लोक त्यांच्या गिणतीतही नसतात.
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो? ५ व्यायाम करा, दुखणं कमी होऊन मिळेल आराम
काही तरुण तर दुचाकी चालवताना वाटेल तसे प्रयोग करतात. कुणी झिकझॅक म्हणजे वेडीवाकडी करत गाडी पळवतं, तर कुणी चालत्या गाडीवर उभं राहतं. हात सोडून बाईक चालविणारेही भरपूर असतात. काही जण वेगात असणाऱ्या गाडीचं करकचून ब्रेक दाबतात आणि मागचं चाक गोलाकार फिरवतात. तर काही जण पुढचं चाक उचलतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतला हा व्यक्तीही अगदी तसाच.
ghantaa या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ३ दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला १ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.
केस गळणं- कमी वयातच पांढरे केस? फक्त ३ योगासनं करा, लांबसडक- काळ्याभोर केसांसाठी खास उपाय
या व्हिडिओमध्ये एक तरुण गाडी चालवत असून मागे त्याची बायको बसलेली आहे. गाडी चालवताना तो तरुण सगळ्यात आधी दोन्ही हात सोडतो. नंतर तोल सावरत चक्क चालत्या गाडीवर उभं राहतो. मागे त्याची पत्नी बिचारी मुकाट्याने त्याचे हे प्रताप बघते आहे. दुचाकी चालवत असताना त्याने केलेलं असं अनाठायी धाडस नेटिझन्सला अजिबातच आवडलेलं नाही.