आजकाल बऱ्याच लोकांच्या घरात इंडियन टॉयलेट तर काहींच्या घरात कमोड असते. पण बहुतेकांना कमोडचा नेमका वापर कसा करावा? याबद्दलचे काही लहान-सहान गोष्टी ठाऊक नसतात. पण याच लहान-सहान गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने चांगल्याच महागात पडू शकतात. बरेच जण टॉयलेट फ्लश करताना झाकण उघडच ठेवतात. पण असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पण आता तुम्ही म्हणाल की, आपण पहिल्यापासून प्रत्येक जण फलाश करताना झाकण उघडेच ठेवतो (Cleaning Tips). पण फ्लश करण्याची ही पद्धत चुकीची असल्याचे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे फ्लश करताना कमोडचे झाकण उघडे ठेवावे की बंद, या प्रश्नावर लोकं संभ्रमात पडले आहेत(Should you flush with a closed or open toilet lid).
पसरतात बॅक्टेरिया
अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?
- आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या मल सोबतच अनेक प्रकारचे टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया देखील बाहेर पडतात. जेव्हा आपण फ्लश करतो, तेव्हा हायस्पीड पाण्याने फ्लश होते. तेव्हा हे बॅक्टेरिया हवेत येतात आणि नंतर बाथरूममध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंपर्यंत पोहोचतात.
- दुसरी मोठी समस्या म्हणजे ई-कोलाय बॅक्टेरिया फ्लश करताना हवेत पसरतात, आणि हे बॅक्टेरिया हवेत ६ तासांपर्यंत जिवंत राहतात. ज्यामुळे या जीवाणूच्या संपर्कात आल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे फ्लश करताना कमोडचे लीड बंद करावे.
रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ
- शिवाय आपण फ्लश करताना कमोडचे झाकण बंद केले नाही तर, बाथरूममध्ये डायरिया निर्माण करणारे बॅक्टेरिया १२ पटीने वाढतात आणि पसरतात. याशिवाय बाथरुममध्ये पसरणाऱ्या बॅक्टेरियामुळे उलट्या, जुलाब यासह इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.