Lokmat Sakhi >Social Viral > नवीकोरी भांडी नेहमी धुवूनच का वापरावी? तज्ज्ञ सांगतात, पोटासाठी अपायकारक काय, भांडी घेतानाच...

नवीकोरी भांडी नेहमी धुवूनच का वापरावी? तज्ज्ञ सांगतात, पोटासाठी अपायकारक काय, भांडी घेतानाच...

Should You Wash New Dishes Before You Use Them? वापरण्यापूर्वी नवीन भांडी धुणे का गरजेचं आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2023 01:28 PM2023-09-01T13:28:50+5:302023-09-01T13:29:35+5:30

Should You Wash New Dishes Before You Use Them? वापरण्यापूर्वी नवीन भांडी धुणे का गरजेचं आहे?

Should You Wash New Dishes Before You Use Them? | नवीकोरी भांडी नेहमी धुवूनच का वापरावी? तज्ज्ञ सांगतात, पोटासाठी अपायकारक काय, भांडी घेतानाच...

नवीकोरी भांडी नेहमी धुवूनच का वापरावी? तज्ज्ञ सांगतात, पोटासाठी अपायकारक काय, भांडी घेतानाच...

जिथे संसार आहे तिथे भांडी आलीच. भांड्यांशिवाय संसार अपूर्ण आहे. घरात जेवण करण्यासाठी विविध प्रकारची भांडी ही लागतातच. अनेक महिलांना भांडी खरेदी करायला आवडते. नवीन भांड्यांमध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करतो. तळण्यासाठी कढई, चपाती शेकण्यासाठी पॅन, भाकरी शेकण्यासाठी तवा. असे विविध प्रकारची भांडी आपण डेली युजमध्ये वापरतो. भांडी जुनी झाली की, आपण नवी भांडी आणतो.

नव्या भांड्यांमध्ये जेवण करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. पण जेवण करण्यापूर्वी भांडी धुवून वापरावी की तशीच असा प्रश्न निर्माण होतो. बाजारातून भांडी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून वापरणे गरजेचं आहे. नवी भांडी कितीही साफ दिसत असली, तरी याला धुवून का वापरावे? भांडी धुवून न वापरल्याने काय होऊ शकते?(Should You Wash New Dishes Before You Use Them?).

यासंदर्भात, बेटरहोम्स अँड गार्डन्समधील यूएनसी प्रोफेसर आणि फूड सेफ्टी एक्‍सटेंशन विशेषतज्ज्ञ, बेन चॅपमन सांगतात, 'नव्या भांड्यांमध्ये अनेक प्रकारचे प्लास्टिक आणि टॉक्सिक मटेरिअल चिटकलेले असतात. ज्यामुळे ते स्वच्छ धुवून वापरणे उत्तम ठरू शकते.'

तेलाची बाटली फार चिकट - मेणचट झाली? ३ सोपे उपाय, बाटली चमकेल स्वच्छ नव्यासारखी

नवी भांडी धुवून का वापरावी?

नवीन स्वच्छ दिसणाऱ्या भांड्यांमध्ये अनेक प्रकारच्या जीवाणू, जंतू, धूळ इत्यादी आढळतात. दुकानात अनेक प्रकारचे ग्राहक येतात, ते भांड्यांना हात लावून तपासतात. त्यावर न दिसणारे संसर्गजन्य जंतू चिटकतात. त्यामुळे भांडी नेहमी धुवून वापरावी. धुवून न वापरल्यास जेवणात हे जंतू मिसळू शकतात.

महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

या पद्धतीने साफ करा नवी भांडी

नवी भांडी साफ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा व्हाईट व्हिनेगर घ्या. त्यात २ चमचे गरम पाणी, आणि एक चमचा डिश वॉश घालून मिक्स करा. स्पंच किंवा सुती कापडाने हलक्या हाताने नवी भांडी पुसून काढा. त्यानंतर पाण्याने धुवून, वापरायला सुरुवात करा. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान, वापरले गेलेले तेल आणि पॉलिशिंग घटकांचा थर निघून जाईल.

Web Title: Should You Wash New Dishes Before You Use Them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.