Join us  

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 3:42 PM

Shouldering 101-year-old grandmother and Ganga water, pilgrim undertakes 270km Kanwar Yatra आजीवरचं असं अनोखं प्रेम तुम्ही कुठं पाहिलं आहे का?

आपल्या अंध आई - वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणारा श्रावण बाळ सगळ्यांना माहिती आहेच. पण हा उत्तरप्रदेशातला आधुनिक श्रावणबाळ वेगळा आहे. तो आपल्या आजीला कावडीत घालून निघाला आणि २७० किलोमीटर कावड यात्रेला घेऊन गेला. आजीवरची माया म्हणावी की श्रद्धा. पण देवकुमार नावाच्या या तरुणाची चर्चा सध्या सोशल मीडियात व्हायरल आहे(Shouldering 101-year-old grandmother and Ganga water, pilgrim undertakes 270km Kanwar Yatra).

उत्तर प्रदेशात सध्या कावड यात्रा सुरु आहे. लोक लांबलाबून कावड घेऊन हरिद्वारला येतात. कावड यात्रेला श्रावणात तिकडे फार महत्त्व. एकदा तरी या यात्रेला जावं असं मानणारे अनेक. ३५ वर्षीय देव कुमार हे एक बांधकाम कंत्राटदार आहेत. त्यांनी हरिद्वार ते धरौ हे त्यांचे मूळ गाव, २७० किलोमीटरचे अंतर.

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

एवढं अंतर त्यांनी आजीला कावडमध्ये बसवून खांद्यावरुन नेत पूर्ण केलं. पायीपायी चालणं अवघड तिथं आजीची काळजी घेत हा तरुण निघाला. त्यांनी कावडीच्या एका बाजूला आपल्या १०१ वर्षीय आजीला म्हणजेच सरस्वती देवीला बसवले, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच समान वजनाच्या पाण्याच्या घागरी ठेवल्या.

पावसाळ्यात घरभर माश्या? 4 टिप्स, माश्यांचा उपद्रव होईल चटकन कमी

यासंदर्भात देव म्हणतात, ''ही माझी अकरावी कावड यात्रा आहे. मी माझ्या आजीला, माझ्या खांद्यावर घेऊन उत्तराखंडमधील हरिद्वारला जाण्याचा निर्णय घेतला. तिचे वजन सुमारे ४८ किलो आहे. समतोल राखण्यासाठी मी दुसऱ्या कावडीवर गंगाजल ठेवले आहे. एकूण ११६ किलो मी उचलून चालत होतो. माझ्या आजोबांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. नाहीतर मी त्यांना देखील सोबत घेऊन आलो असतो.''अर्थातच या अनोख्या कावड यात्रेची सोशल मीडियात चर्चा आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाउत्तर प्रदेश