सध्या बॉडी शेमिंगमुळे बरेच जण वजन कमी करण्याच्या मैदानात उतरतात. पण वजन कमी करणं हे खरंच खायचं काम नाही. मार्केटमध्ये सध्या वजन कमी करण्याचे अनेक फंडे उपलब्ध आहेत. त्यातील काही उपायांमुळे वजन कमी होते, पण काही उपायांमुळे आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा वजन कमी करणं हे आपल्या जीवाशी येऊ शकतं. त्यामुळे झटपट वजन कमी करण्याचा नाद सोडलेला बरा.
मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये वेट लॉसच्या औषधामुळे एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. झटपट वेट लॉस करण्याच्या नादात त्यांनी 'ओझेम्पिक' नावाच्या औषधाचा वापर केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यामुळे वेट लॉस करणं हे आपल्या जीवाशी तर येत नाही ना, याची काळजी नक्कीच घ्या(Side-effects linked to Ozempic kills a woman in Australia, claims husband).
नक्की घडलं काय?
Trish died whilst taking weight loss drugs.
— 60 Minutes Australia (@60Mins) November 5, 2023
Roy Webster believes his wife’s weight loss medication contributed to her death.
Watch #60Mins on 9Now: https://t.co/14qCsjsDCcpic.twitter.com/ZDQKKIoKUm
मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या वजन कमी करण्यासंबंधित औषधं मिळतात. ट्रिश वेबस्टर या ५६ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेने, टाइप २ मधुमेहाच्या उपचारात वापरल्या जाणार्या 'ओझेम्पिक' नावाच्या औषधाचा वापर केला. तिला तिच्या मुलीच्या लग्नापर्यंत सुडौल दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी 'ओझेम्पिक' हे औषध इंजेक्शनद्वारे घेतले. मात्र, इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा त्रास झाला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचे पती लोकांना हे वजन कमी करण्याचे औषध व घेण्याचा सल्ला देतात.
न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वेबस्टरने सक्सेंडा नावाच्या इंजेक्शनसोबत ओझेम्पिक औषध घेतले होते. यामुळे त्यांचे ५ महिन्यात १५ किलो वजन कमी देखील झाले. सुरुवातीला औषधाच्या वापरामुळे त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. मात्र काही दिवसांनंतर त्या आजारी पडू लागल्या.
‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?
या औषधाच्या सततच्या वापरामुळे वेबस्टरचा मृत्यू झाला की अन्य काही कारणांमुळे, हे अद्याप वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. पण वेबस्टरचा नवरा रॉय वेबस्टर आपल्या पत्नीच्या मृत्यूमागे ओझेम्पिकला जबाबदार धरत आहे.
यांसंदर्भात रॉय यांनी '६० मिनिट्स ऑस्ट्रेलिया' या ऑस्ट्रेलियन मीडिया संस्थेला सांगितले की, 'औषधाच्या वापरामुळे पत्नीच्या तोंडातून तपकिरी रंगाचा पदार्थ बाहेर पडत होता. तिला काही वेळानंतर श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागली. मात्र, काही वेळेनंतर तिने आपले प्राण सोडले.' मात्र, तिच्या मृत्यूचे कारण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन असल्याचे सांगण्यात आले आहे.
विनी आणि ग्लेन मॅक्सवेलची लव्हस्टोरी! प्रेमातही त्याने मानली नाही हार, वाचा प्यारवाली लव्हस्टोरी..
ओझेम्पिक वजन कमी करण्यास कशी मदत करते?
ओझेम्पिक हे औषध टाइप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी मदत करते. शिवाय याने वजनही कमी होते. हे औषध मधुमेहाच्या रूग्णांच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कारण डायबिटिजग्रस्त रुग्ण हे लठ्ठपणाशीही झुंजत असतात. त्यामुळे त्यांना ओझेम्पिक नावाचे इंजेक्शन दिले जाते.