Lokmat Sakhi >Social Viral > दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने एक निर्णय घेतला, ज्याची सध्या चर्चा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 03:54 PM2024-02-27T15:54:53+5:302024-02-27T16:16:27+5:30

Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने एक निर्णय घेतला, ज्याची सध्या चर्चा आहे.

Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon | दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

आपल्या भारतात लग्न झाल्यानंतर लगेचच पाळणा हलला पाहिजे असं म्हणतात. वयात लग्न, वयात मुलं झालेली चांगली असं आपल्याला वडिलधारे सांगत असतात. पण वय निघून गेल्यानंतर मुलं होण्यात अडचण निर्माण होते असं म्हणतात. हे कितपत खरं आहे? बरं, पन्नाशीनंतर मुलांना जन्माला घालणं हा देखील एक गुन्हा आहे का? सध्या दिवंगत पंजाबी गायब सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) आई याच कारणामुळे सोशल मीडियात ट्रोल होत आहे.

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची २०२२ मध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली. मृत्यूच्या २ वर्षानंतर सिद्धूची आई चरणकौर पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आली आहे, आणि चर्चेचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी. पुढील महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार असून, सिद्धू मुसेवालाची आई लवकर आई होणार आहे. मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. पण बातमी सोशल मिडियामध्ये पसरताच काहींनी आनंद तर, काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे(Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon).

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आई

रिपोर्टनुसार, सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर आणि वडील बलकौर सिंह पुढील महिन्यात बाळाचं आपल्या घरात स्वागत करतील. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने ते पुन्हा आई वडील होणार आहेत. सिद्धू मुसेवालाच्या आईचं वय ५८ तर वडिलांचं वय ६० आहे.

नववीत मिळाली चित्रपटाची ऑफर-१९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; दिव्या भारतीला कमी वयात मिळालं यश पण...

सिद्धू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. २९ मे २०२२ रोजी त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा तो २९ वर्षांचा होता. अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. लेकाच्या हत्येनंतर आईवडिलांना याचा जबरदस्त धक्का बसला, आणि ते बरेच महिने मुलाच्या हत्येच्या शोकात बुडाले होते. आत ते पुन्हा आपल्या प्रेग्नन्सीसाठी चर्चेत आले असून, त्यांना काही नेटकरी ट्रोल करताना दिसून येत आहे.

काहींनी केलं ट्रोल, तर काहींनी..

एकीने कमेण्ट करत, 'त्याचं वय काय? या वयात त्या मुलाला जन्म देऊ शकतात?', तर दुसऱ्याने 'यह कोई उमर है? प्रेग्नंट होने की?' तर आणखी एका नेटकऱ्याने 'युजर्सने ट्रोल करू नये, त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आणि कमी वयात त्यांनी आपला मुलगा गमावला आहे, ते लोकं पुन्हा मुलासाठी विचार करू शकतात.' तर अशा प्रकारे काहींनी समर्थन तर काहींनी वयावरून त्यांना ट्रोल केलं आहे.

एकटीने प्रवास करणाऱ्या तरुणीचे बळकावले सीट, ट्विट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची मदत

सिद्धू मुसेवाला फक्त गायक नव्हता तर..

सिद्धूने कमी वयात मेहनत घेऊन प्रसिद्धी मिळवली. तो फक्त गायक नसून, राजकारणतही सक्रीय होता. त्याच्या गायकीचे लाखो चाहते होते. २०२१ साली त्याने राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसकडून त्याने निवडणूकही लढवली, मात्र यात त्याचा पराभव झाला.

Web Title: Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.