Join us  

खिडक्याच्या जाळ्या धुळीने माखल्या? पाण्यात ३ गोष्टी मिसळून पुसा, न घासताही चटकन होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 10:03 AM

Simple & Easiest way to clean window mosquito net : ऑयली किचन नेट स्वच्छ करण्यासाठी एक भन्नाट ट्रिक

घराची स्वच्छता करताना अनेकदा किचन साफ करणं राहून जातं (Kitchen Net). खासकरून किचनची खिडकी साफ करण्याचा कंटाळा करतो. खिडक्यांच्या काचाबाहेर काही जण जाळ्या लावतात (Cleaning Tips). जाळ्यांमुळे घरात डास, किडे किंवा कबुतरे घरात शिरत नाहीत. पण जाळ्यांवर धूळ जमा होते. अशावेळी जाळी कशी स्वच्छ करावी असा प्रश्न निर्माण होतो.

जाळीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यावर घरात धूळ येते. त्यामुळे वेळीच जाळी स्वच्छ करणं गरजेचं. जर आपल्याला जाळी स्वच्छ करणं किचकट, वेळखाऊ आणि मेहनतीचं काम वाटतं असेल तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा. यामुळे काही मिनिटात जाळ्या स्वच्छ होतील(Simple & Easiest way to clean window mosquito net).

खिडकीची जाळी स्वच्छ करण्यासाठी उपाय

लागणारं साहित्य

बेकिंग सोडा

फक्त १० मिनिटांत करा वांग्याचे काप, कुरकुरीत-खमंग आणि पौष्टिक-पावसाळ्यात वाढवतात भूक

व्हिनेगर

डिशवॉश लिक्विड

या पद्धतीने क्लीनर स्प्रे तयार करा

सर्वात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड घालून मिक्स करा. तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा प्रकारे क्लीनर लिक्विड वापरण्यासाठी रेडी.

व्यायामाला वेळ नाही-तोंडावरही ताबा नाही? झोपण्यापूर्वी ५ गोष्टी करा; काही न करता वजन घटेल

खिडकीच्या जाळीवरची धूळ आधी साफ करून घ्या. नंतर त्यावर क्लीनर लिक्विड स्प्रे करा. एक स्पंज घ्या. त्या स्पंजने खिडकीची जाळी घासून, धूळ पुसून काढा. या क्लीनर लिक्विडचा वापर खिडक्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया