घरात एकदाच वर्षभराचं सामान भरून ठेवलं तर पुन्हा पुन्हा आणावे लागत नाही. घरांत गहू, डाळी, इतर अन्नधान्य अनेकजण स्टोअर करून ठेवतात. अनेकदा धान्याला किडे लागल्यामुळे अन्नधान्य खराब होण्याची भिती असते. (7 unique ways to protect pulses from insects) धान्याला किड लागू नये. यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. यामुळे धान्यात अळ्या, किडे शिरणार नाहीत आणि धान्य चांगले टिकून राहील. (Simple Tips To Protect Pulses And Grains From Insects At Home)
१) तुम्ही अन्नधान्य, डाळी ज्या डब्यात ठेवता ते व्यवस्थित, स्वच्छ असायला हवेत. यात कोणत्याही प्रकारचे मॉईश्चर असू नये. मॉईश्चर लागल्याने अन्न खराब होण्याचा धोका असतो. ज्यामुळे किटक सहज डब्यात शिरतात. म्हणून स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पीठ खराब होईल असं वाटत असेल तर सुकी लाल मिरची तुम्ही पिठात घालू शकता. गव्हात पोरकिडे होऊ नयेत यासाठी एका कापसात जाड मीठ एका कापडात बांधून गव्हात ठेवा. जेणेकरून गहू महिनोंमहिने चांगले राहतील.
२) धान्यातील अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी डाळीच्या डब्यात कच्चे सोललेले लसूण घाला. याशिवाय तुम्ही लाल मिरच्याही घालू शकता. काहीजण डाळ, तांदळाच्या डब्यात लवंग घालतात. जेणेकरून अन्नधान्याला किड लागणार नाही.
३) डाळींना किड लागू नये यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात डाळीच्या डब्यात कडुलिंबाची काही पानं घालून ठेवा. यात कडुलिंबाची किंवा पुदीची पानं घातल्यामुळे मॉईश्चर राहणार नाही. याशिवाय डाळी दीर्घकाळ सुरक्षित, चांगल्या राहतील. डाळींना राईचं तेल लावून उन्हात सुकवून नंतर डब्यात ठेवा. या उपायाने डाळी खराब होणार नाहीत.
४) रव्याला किडे किंवा अळ्या लागू नयेत यासाठी रवा कढईत भाजून घ्या. त्यानंतर थंड झाल्यानंतर एका डब्यात ठेवा. रव्यात तुम्ही लवंगसुद्धा ठेवू शकता.
५) मध लवकर खराब होऊ नये किंवा मधाला मुंग्या लागू नये यासाठी मधाच्या बरणीत आठ ते दहा काळी मिरी त्यात घाला यामुळे मध जास्त दिवस टिकून राहील.
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली अन् बाई वाटाणे सोलत बसली; व्हायरल फोटो पाहून लोक म्हणाले...
६) तांदूळ चांगले ठेवण्यासाठी तुम्ही त्यात पुदिन्याची सुकी पानं घालू शकता. याच्या तीव्र वासाने किडे लागणार नाहीत. याशिवाय तुम्ही कडुलिंबाची पानं सुद्धा तांदळाच्या डब्यात ठेवू शकता. यामुळे तांदळाला किड लागत नाही.