Join us  

स्वयंपाकाचीच नाही तर पूजेची भांडीही होतील स्वच्छ - चकचकीत! फक्त दिवाळीतील पणत्यांचा 'असा' करा वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2024 12:50 PM

Iron tawa cleaning with diwali waste clay diya : how to clean copper vessels at home with diwali waste clay diya : Simple Trick To Clean Copper Steel Utensils With Diwali Waste Clay Diya : घरातील रोजच्या स्वयंपाकाची व तांब्या - पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी, दिवाळीतील पणत्या वापरा..

दिवाळी ही दिवे आणि पणत्यांशिवाय अपूर्णच आहे. दिवाळीत आपण मातीचे वेगवेगळ्या आकाराचे दिवे किंवा पणत्यांची आरास करतो. दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी आपण एकाचवेळी खूप मातीचे दिवे, पणत्या विकत घेतो. दिवाळीचे तीन ते चार दिवस आपण या पणत्या दिवे लावून दिवाळी साजरी करतो. परंतु दिवाळी झाल्यानंतर या मातीच्या पणत्यांचे करायचे काय असा प्रश्न पडतो. अशावेळी आपण या मातीच्या पणत्यांचा वापर करून घरातील रोजची भांडी, पूजेची भांडी देखील स्वच्छ करु शकतो. 

रोजची स्वयंपाक करण्याची भांडी यात लोखंडाची कढई, तवा रोज वापरुन खराब होतो. यासोबतच, घरातील पुजेची किंवा वापरण्यात येणारी तांब्या - पितळेची  भांडी लगेच काळी पडतात. ही रोजच्या स्वयंपाकाची आणि पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण साबण किंवा लिक्विड सोपचा वापर करतो. यामुळे त्यावर तात्पुरती चमक येते. ही चमक दीर्घकाळ टिकत नाही. आपल्याला जर तांब्या - पितळ्याची भांडी किंवा रोजची स्वयंपाकाची भांडी कमी मेहनत घेऊन, न घासता घरच्या साहित्यात चमकवायची असतील तर, दिवाळीच्या पणत्यांचा वापर करा. दिवाळीच्या पणत्यांचा वापर केल्यामुळे रोजच्या स्वयंपाकाची भांडी तसेच तांब्या - पितळेची भांडी चकाचक स्वच्छ होऊन नव्यासारखी चमकतील(Simple Trick To Clean Copper Steel Utensils With Diwali Waste Clay Diya).

मातीच्या पणत्या फेकून न देता त्याचा असा करा वापर... 

१. पूजेची तांब्या - पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी... 

सर्वप्रथम, ४ ते ५ साध्या मातीच्या पणत्या घ्या, किसणीने त्यावर घासून त्याची पावडर तयार करून घ्या. ही माती एका वाटीत काढून घ्या. त्यात एक चमचा मीठ, लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट स्पंज किंवा हातांच्या मदतीने भांड्यांवर लावून तांब्या - पितळेची भांडी हलक्या हाताने घासा. आपल्याला अधिक कष्ट घेऊन घासण्याची गरज नाही. या पेस्टमुळे भांड्यांवरील काळपटपणा निघून जातो. तयार पेस्टच्या मदतीने भांडी घासल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या पेस्टमुळे भांड्यांवरील काळपट डाग निघून जाईल व भांडी नव्यासारखी चमकतील.

दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरचे तेलकट, काळे डाग होतील मिनिटभरात स्वच्छ, पाहा दिवे स्वच्छ करण्याची खास पद्धत...

फरशीवरील लाल गेरु आणि रांगोळीचे डाग जात नाहीत? ५ ट्रिक्स, फरशी स्वच्छ होऊन दिसेल पुन्हा नव्यासारखी!

२. रोजच्या स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करण्यासाठी... 

रोजच्या स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये कढई, तवा रोज वापरून तेलामुळे चिकट तेलकट होतात. अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी फार घासावी लागतात, खूप मेहेनत करावी लागते. अशावेळी आपण या दिवाळीतील वापरलेल्या पणत्यांचा वापर करु शकतो. यासाठी सर्वात आधी या वापरलेल्या पणत्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर, एका डिशमध्ये भांड्यांसाठी जो साबण (iron utensils cleaning hack with waste diya) वापरतो तो साबण किसणीवर किसून बारीक करून घ्यावा. या साबणाच्या चुऱ्यात किंचित चमचाभर पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. हा तयार गोळा मातीच्या पणत्यांमध्ये भरून घ्यावा. अशाचप्रकारे आपण थोडेसे डिटर्जंट घेऊन ते देखील किंचित पाण्यांत भिजवून या पणत्यांमध्ये भरून ठेवू शकता. रोजची कढई, तवा (Iron tawa cleaning with diwali waste clay diya) घासताना या पणत्यांमध्ये ज्या भागात साबण डिटर्जंट भरला आहे तो भाग भांड्यांच्या पृष्ठभागावर घासून घ्यावा. अशाप्रकारे आपण या पणत्यांचा वापर करून घरातील रोजच्या स्वयंपाकाची भांडी देखील स्वच्छ करु शकतो.

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...

टॅग्स :सोशल व्हायरलदिवाळी 2024स्वच्छता टिप्स