Join us  

फोडणीचे तेल उडून किचनच्या टाईल्स चिकट - तेलकट होऊच नयेत म्हणून ५ टिप्स, टाईल्स दिसतील नव्यासारख्या शुभ्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2024 4:47 PM

Simple Ways to Avoid Oil Splatter When Frying : How to prevent oil from splattering when frying : How to avoid splatter when cooking with oil : किचनच्या भिंती, टाईल्सवर फोडणीचे तेल उडून त्या चिकट, तेलकट होऊ नये यासाठीच हे उपाय...

किचनमध्ये आपण रोज काही ना काही पदार्थ तयार करत असतो. हे पदार्थ तयार करताना आपण वेगवेगळे मसाले, तेल किंवा इतर काही पदार्थांचा वापर करतो. किचनमध्ये स्वयंपाक करताना किचनचा ओटा हा सगळ्यात जास्तवेळा वापरला जातो. किचनचा ओटा जितका जास्तवेळ वापरला जातो तितकाच तो खराबही होतो. किचनमध्ये आपण स्वयंपाक करताना काहीवेळा तेल, मसाले, इतर पदार्थ ओट्यावर सांडतात. वारंवार ओट्यावर असे पदार्थ सांडले की ओटा खराब होतो(How to prevent oil from splattering when frying).

एवढेच नव्हे तर काहीवेळा फोडणी देताना ही फोडणी नकळतपणे किचनच्या भिंतीवर उडते. अशावेळी याचे डाग भिंतींवर पडल्याने किचनच्या भिंती खराब होतात. त्याचबरोबर फोडणी देताना त्याचे तेल उडून भिंतींवर त्याचे थेंब चिकटून बसतात. तसेच पदार्थ शिजताना त्याची वाफ बाहेर निघत असते ही वाफ किचनच्या भितींवर जाऊन बसते यामुळे किचनच्या भिंती (How to avoid splatter when cooking with oil ) या कायम तेलकट - चिकट होतात. अशा परिस्थितीत, या भिंती रोज पुसून जरी स्वच्छ ठेवल्या तरी त्यावरचे डाग जाता जात नाही. किचनच्या भिंती, टाईल्स या तेलामुळे चिकट, तेलकट होऊन खराब दिसू लागतात. असे होऊ नये म्हणून आपण फोडणी देताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात(Hack for Preventing Oil Splatter While Cooking).

फोडणी देताना अशी घ्या काळजी... 

१. भाज्या धुवून तेलात ओल्या भाज्या घालू नये :- कुठलीही भाजी ओली असेल आणि अशी ओली भाजी तेलात टाकली तर तेलाचे बारीक बारीक थेंब आजूबाजूला उडतात. जेव्हा पाणी गरम तेलाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे वेगाने वाफेत रूपांतर होते, ज्यामुळे तेल फुटते आणि सर्वत्र उडते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भाजी ही धुवून लगेच आहे तशीच ओली गरम तेलात घालू नये. भाजी आधी संपूर्णपणे वाळवून घ्यावी आणि त्यानंतरच ती गरम तेलात घालावी. 

मसाल्यांची एकदा उघडलेली पाकिटे - पुडे पुन्हा सील करण्याच्या २ भन्नाट ट्रिक्स, मसाल्यांचा सुगंध टिकेल जास्त...

२. खोलगट भांड्यांचा वापर करा :- फोडणी देण्यासाठी शक्यतो खोलगट भांड्यांचा वापर करावा. खोलगट भांड्यांचा वापर केल्याने आतील फोडणीचे तेल बाहेर उडत नाही. भांड्यांच्या कडा उंच असल्यामुळे कढईतून तेल बाहेर पडण्यापासून आणि शेगडीचा वरचा भाग घाण होत नाही. याचबरोबर आपण लोखंडाचा तवा देखील वापरु शकता कारण लोखंडी तवा सम प्रमाणांत उष्णता वितरीत करतात यामुळे तेल बाहेर उडत नाही. 

३. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवा :- कढईत कोणताही पदार्थ तळताना किंवा शिजवताना गॅस कायम मंद आचेवर ठेवावा. गॅस मंद आचेवर ठेवल्याने तेल गरजेपेक्षा जास्त गरम होत नाही. यामुळे ते बाहेर उडत नाही. जर तेल खूप जास्त गरम असेल तर ते उडते याउलट तेल जर थंड असेल तर पदार्थ जास्तीचे तेल शोषून घेतात. काही गोष्टी तळायच्या असतील तर तळण्यासाठी तेल नेहमी मंद आचेवर गरम करा. 

पदार्थात हळद जास्त पडली? करा ५ झटपट उपाय, टेंशन विसरा- चव आणि रंग होईल परफेक्ट...

४. योग्य तेलाची निवड :- कढईतून तेल बाहेर उडते की नाही हे तेलाच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते. यातही तेलाची योग्य निवड करावी. जास्त स्मोकिंग पॉईंट असणारे तेल बाहेर उडण्याची शक्यता कमी असते. नेहमी हाय स्मोकिंग पॉईंट् असणारे तेल वापरावे. शेंगदाणे, सूर्यफूल यांपासून तयार झालेल्या तेलांचा स्मोकिंग पॉईंट् हा हाय असतो त्यामुळे ही दोन्ही तेल वापरणे फायदेशीर ठरते. कधीही दोन वेगवेगळ्या प्रकारची तेल एकदम मिक्स करु नका यामुळे देखील तेल गरम होऊन बाहेर उडण्याची शक्यता जास्त असते. 

५. मिठाचा असा करा वापर :- कोणताही पदार्थ तयार करताना तेलाचा वापर करत असताना, किंवा एखाद्या पदार्थाला फोडणी देण्यासाठी तेल ओतले असता त्यात आधी चिमूटभर मीठ घालावे. मीठ घालून झाल्यावरच फोडणीचे जिन्नस घालावे. यामुळे फोडणी देताना तेल टाईल्स किंवा भिंतींवर उडत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स