Lokmat Sakhi >Social Viral > दुबईमधील हॉटेलमध्ये स्वतः शेफ बनल्या आशा भोसले, बनवले पदार्थ, पाहा त्यांनीच शेअर केलेला व्हिडिओ

दुबईमधील हॉटेलमध्ये स्वतः शेफ बनल्या आशा भोसले, बनवले पदार्थ, पाहा त्यांनीच शेअर केलेला व्हिडिओ

Singer Asha Bhosle Shares Video of Cooking From Restaurant Kitchen in Dubai : प्रसिद्ध गायिका जेव्हा स्वत: काहीतरी बनवून ग्राहकांना ट्रीट देते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 04:41 PM2022-08-10T16:41:23+5:302022-08-10T16:45:54+5:30

Singer Asha Bhosle Shares Video of Cooking From Restaurant Kitchen in Dubai : प्रसिद्ध गायिका जेव्हा स्वत: काहीतरी बनवून ग्राहकांना ट्रीट देते...

Singer Asha Bhosle Shares Video of Cooking From Restaurant Kitchen in Dubai : Asha Bhosle, who became a chef herself in a hotel in Dubai, made the dishes, see the video shared by her | दुबईमधील हॉटेलमध्ये स्वतः शेफ बनल्या आशा भोसले, बनवले पदार्थ, पाहा त्यांनीच शेअर केलेला व्हिडिओ

दुबईमधील हॉटेलमध्ये स्वतः शेफ बनल्या आशा भोसले, बनवले पदार्थ, पाहा त्यांनीच शेअर केलेला व्हिडिओ

Highlightsअनेकांनी आशाताईंच्या हातचे एकदा तरी ट्राय करायचे आहे अशी इच्छाही कमेंटमध्ये व्यक्त केली आहे. रेस्तरॉचा अॅम्बियन्स, येथील स्वच्छता, याठिकाणची बसण्याची व्यवस्था आणि काही पदार्थ अशा बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले या त्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेतच. एकीकडे अनेक वर्ष आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई सुगरण असल्याने खवय्यांना तृप्त करण्याचेही काम तितकेच उत्तम करतात. नुकताच त्यांनी किचनमधील आपला एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये आशाताई हॉटेलच्या किचनध्ये शेफच्या भूमिकेत दिसत आहेत. आता इतकी प्रसिद्ध गायिका या वयात हॉटेलमध्ये काय बनवते असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. पण आशाताई दुसऱ्या-तिसऱ्या कोणाच्या नाही तर स्वत:च्या मालकीच्या दुबईतील हॉटेलमध्ये एक खास डीश बनवत आहेत. दुबईमध्ये २० वर्षांपूर्वी त्यांनी Asha's Restaurant सुरू केले. हे त्यांचे पहिलेच रेस्तरॉ असून त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकले. आता अनेक शहरांमध्ये, देशांमध्ये त्यांच्या रेस्टरॉच्या शाखा असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे (Singer Asha Bhosle Shares Video of Cooking From Restaurant Kitchen in Dubai). 


हा व्हिडिओ शेअर करत आशा ताईंनी सांगितले की, त्यांची रेस्टॉरन्ट चेन 'आशाज रेस्टॉरन्ट्स' सुरू होऊन २० वर्षे झाली.  आशा ताईंनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दुबईतील WAFI मॉलमधील त्यांच्या रेस्टॉरन्टमधील एक सुंदर दृश्य कॅमेरात टिपले आहे. किचनमध्ये आशाताई साडीवर पांढरा कोट घालून पदार्थ बरोबर आहे ना हे तपासताना दिसत आहेत. एका पॅनमध्ये भाताचा कोणतातरी प्रकार असून हातातील उलथन्यामध्ये वरचा थोडा भात घेऊन त्याचा वास आशाताई घेताना दिसतात. या व्हिडिओला त्यांच्याच आवाजातले 'आओ ना गले लगाओ ना...'  या गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना आशाताई लिहीतात, 'आशा रेस्टॉरन्टमध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा. यासोबतच त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत.

यूके आणि गल्फ सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यश मिळवल्यानंतर, आशाताईंनी भारतातही अनेक रेस्टॉरन्ट सुरू केले. दुबईतील या रेस्टॉरन्टबद्दल बोलताना आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसल म्हणाले की, 'दुबई हे त्याच्या कॉस्मोपॉलिटन गोष्टीमुळे रेस्टॉरन्टसाठी एक उत्कृष्ट ठिकाण होतं, त्यामुळे याठिकाणहून सुरुवात करण्यात आली. याबरोबरच जनाई भोसले या आशाताईंच्या नातीनेही त्यांच्या दुबईतील रेस्तरॉ मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमच्यासोबत जेवायला या असं आमंत्रण ती देत आहे. या व्हिडिओमध्ये रेस्तरॉचा अॅम्बियन्स, येथील स्वच्छता, याठिकाणची बसण्याची व्यवस्था आणि काही पदार्थ अशा बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. १७ तासांपूर्वी शेअर केल्लाया आशाताईंच्या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ३२ हजार लाइक्स आले आहेत. तसेच अनेकांनी आशाताईंच्या हातचे एकदा तरी ट्राय करायचे आहे अशी इच्छाही कमेंटमध्ये व्यक्त केली आहे. 

Web Title: Singer Asha Bhosle Shares Video of Cooking From Restaurant Kitchen in Dubai : Asha Bhosle, who became a chef herself in a hotel in Dubai, made the dishes, see the video shared by her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.