Join us  

साहेब गॅस कोण पेटवणार? अधिकाऱ्याने पोस्ट केला पोहे करतानाचा फोटो, लोकांनी का विचारले विचित्र प्रश्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 11:53 AM

गॅसच्या किंमतीपासून ते सुटाबुटात पोहे करण्यापर्यंत प्रश्न विचारणाऱ्या नेटीझन्सची कमाल

ठळक मुद्देचांगला पोहे करतानाचा फोटो टाकला तर अधिकाऱ्याला केलं नेटीझन्सनी ट्रोलएकाहून एक भन्नाट प्रश्न विचारणाऱ्या नेटीझन्सची कमालच

आयएएस अधिकारी म्हणजे कामाचा ताण...सतत मिटींग्ज...एकदम बिझी शेड्यूल...या सगळ्यात त्यांना आपल्या कुटुंबासाठी आणि स्वत:साठी वेळ देणे अनेकदा अवघड होऊन बसते. पण त्यातूनही काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी करुन हे अधिकारी कुटुंबियांना खूश करण्याचा प्रयत्न करतात. कानपूरचे महापालिका आयुक्त राज शेखर यांनी नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये ते स्वयंपाकघरात पोहे करताना दिसत आहेत. सूट-बुट घालून राज शेखर कढईतील पोहे हलवत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. आता त्यांनी इतके छान पोहे केले म्हणून त्यांचे खरं तर कौतुक व्हायला हवे ना. पण तसे न होता हे अधिकारी एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल झाले आहेत. 

ट्विटर अकाऊंटवर त्यांनी आपला फोटो पोस्ट करत “मला शुभेच्छा द्या, मी पाककलेत नशीब अजमावण्याचा प्रयत्न करतोय. होम मिनिस्टरच्या गाईडन्सने मी पोहे बनवतोय.” असं म्हटलं आहे. सुरुवातीला एक अधिकारी पोहे करत असल्याने त्यांचे नेटीझन्सनी भरपूर कौतुक केले. पण नंतर काही जणांना एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे ते पोहे करत असलेल्या कढईखालील गॅस बंद होता. त्यामुळे त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले. त्यानंतर काही नोटीझन्स या राज शेखर यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी पोहे झाल्यानंतर गॅस बंद केला असेल आणि नंतर फोटो काढला असेल असा युक्तीवाद लढवला. 

सुटाबुटात तुम्ही पोहे करता हे ठिक आहे, पण गॅसही पेटवायचा असतो, साहेब गॅस कोण पेटवणार, नुसताच चमचा धरुन फोटोसाठी अॅक्शन तर केली नाही ना, गॅस बंद आणि कानात घातलेले एअरपॉड सुरू, परफेक्ट इंडियन ब्युरोक्रॅट म्हणत अनेकांनी यंत्रणेची खिल्ली उडवताना मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे जागरुक असलेल्या नेटीझन्सपुढे तुमचे फारसे काही चालत नाही हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. राज शेखर यांना एकाहून एक भन्नाट प्रश्न विचारत चांगलेच ट्रोल केले. काहींनी तर बिरबलाच्या खिचडीशी त्यांची तुलना केली आहे. शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही यावर काहीशी टोमणा मारणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, स्वयंपाकाचा गॅस इतका स्वस्त केल्याचा संदेश केंद्र सरकारला दिल्याबद्दल धन्यवाद. आता गॅसशिवायही लोकांच्या सामुहीक रागामळे तयार होणाऱ्या ऊर्जेनी अन्न शिजवता येईल.   

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटरट्रोलव्हायरल फोटोज्