Lokmat Sakhi >Social Viral > स्कीन टाइटनिंग ट्रिटमेंट पडली महागात; महिलेची मान झाली अक्षरश: पालीसारखी...

स्कीन टाइटनिंग ट्रिटमेंट पडली महागात; महिलेची मान झाली अक्षरश: पालीसारखी...

Woman left with Lizard Neck After doing Skin Tightening Treatment : महिलेला स्वत:चाच गळा पाहून वाटू लागली भिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 01:35 PM2022-08-11T13:35:17+5:302022-08-11T13:43:29+5:30

Woman left with Lizard Neck After doing Skin Tightening Treatment : महिलेला स्वत:चाच गळा पाहून वाटू लागली भिती...

Skin tightening treatments ; The woman's neck was literally like Lizard | स्कीन टाइटनिंग ट्रिटमेंट पडली महागात; महिलेची मान झाली अक्षरश: पालीसारखी...

स्कीन टाइटनिंग ट्रिटमेंट पडली महागात; महिलेची मान झाली अक्षरश: पालीसारखी...

Highlightsया ट्रीटमेंटसाठी त्यांनी ५०० युरो म्हणजे साधारण ४१,०२९ रुपये इतका खर्च केला. जेन यांनी त्यांच्यावर अशाप्रकारे चुकीची ट्रीटमेंट करणाऱ्या ब्युटीशियन विरोधात तक्रार दाखल केली

वय वाढत जाते तसे आपले शरीर थकते. त्वचा सुरकुतणे हे त्याचेच एक महत्त्वाचे लक्षण आहे. वाढलेले वय कोणालाच नको असते, आपण कायम तरुण दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण काही ना काही उपायही करतो. कधी हे उपाय घरगुती असतात तर कधी पार्लरमध्ये जाऊन आपण महागड्या ट्रीटमेंट घेतो. आपली त्वचा कायम घट्ट राहावी यासाठी आपण फेशियलसारख्या ट्रीटमेंट तर करतोच. पण तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्याने सतत नवनवीन  काही ना काही गोष्टींची भर पडत असते. त्वचेवरील केस किंवा मस काढण्यासाठी ज्याप्रमाणे आपण लेझर ट्रीटमेंट घेतो त्याचप्रमाणे मानेच्या सुरकुत्या काढण्यासाठीही काही तांत्रित ट्रीटमेंट केल्या जातात. आपल्याला वय वाढले की साधारणपणे मानेवर जास्त प्रमाणात सुरकुत्या येतात. याच सुरकुत्या काढण्यासाठी आणि मानेची त्वचा टाईट करण्यासाठी एका महिलेने एक खास ट्रीटमेंट घेतली (Woman left with Lizard Neck After doing Skin Tightening Treatment). 

(Image : Google)
(Image : Google)

पण त्याचा परीणाम इतका वाईट झाला की तिची त्वचा तर टाईट झालीच नाही. पण या महिलेच्या त्वचेवर अतिशय विचित्र असे डाग पडले. युनायटेड किंग्डम येथे राहणारी ५९ वर्षीय जेन बोमन नामक महिला आपल्याला डबल चीन आहे म्हणून बरेच दिवसांपासून हैराण होती. वजन कमी झाल्याने त्यांची गळ्याच्या भागातील त्वचा अचानक लोंबायला लागली. यावेळी तिला फ्रायब्रोप्लास्ट प्लाज्मा या उपचारांबाबत माहिती मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेन यांनी बोटॉक्स ट्रीटमेंट करण्यासाठी काही संपर्क मिळवले आणि जास्त माहिती न घेता त्यांनी ही ट्रीटमेंटही केली. मात्र आठवडाभरानंतर त्यांच्या गळ्याभोवती विचित्र खुणांशिवाय कोणताच बदल दिसून आला नाही. जेन यांचा पूर्ण गळा लाल रंगाच्या ठिपक्यांनी भरला गेला. 

(Image : Google)
(Image : Google)

‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रीटमेंटमुळे आपल्या गळ्याची अवस्था इतकी वाईट झाली की आपण घराबाहेर पडणे बंद केले. आपला गळा एखाद्या पालीसारखा दिसत असल्याने आपल्याला खूप लज्जास्पद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. घराबाहेर पडायचेच असल्यास स्कार्फ बांधल्याशिवाय त्या बाहेर जात नाहीत असेही त्यांनी सांगतिले. या ट्रीटमेंटमुळे आपली अवस्था बिकट झाली असून यापेक्षा माझा गळ्याची त्वचा आधीसारखी लटकली असती तरी चालले असते अशी भावना जेन यांनी व्यक्त केली. या ट्रीटमेंटसाठी त्यांनी ५०० युरो म्हणजे साधारण ४१,०२९ रुपये इतका खर्च केला. त्यामुळे पैसे तर वाया गेलेच पण हा वेगळाच त्रास मागे लागला. या ट्रीटमेंटनंतर त्यांच्या गळ्याची आग व्हायला लागली, ट्रीटमेंट करणाऱ्या व्यक्तीला हे सांगितल्यावर आग झाल्याशिवाय ट्रीटमेंट पूर्ण होणार नाही असे त्यांनी सांगितल्याने आपण ट्रीटमेंट पूर्ण केली असेही जेन म्हणाल्या. जेन यांनी त्यांच्यावर अशाप्रकारे चुकीची ट्रीटमेंट करणाऱ्या ब्युटीशियन विरोधात तक्रार दाखल केली असल्याचेही ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. 
 

Web Title: Skin tightening treatments ; The woman's neck was literally like Lizard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.