Lokmat Sakhi >Social Viral > पाहा इंग्रजीत वडापावला काय म्हणतात, लहानगीचा भन्नाट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

पाहा इंग्रजीत वडापावला काय म्हणतात, लहानगीचा भन्नाट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Small Girl Viral Video of saying Vadapav in English : हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला असून जवळपास २ लाख जणांनी तो लाईक केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 04:55 PM2024-01-21T16:55:24+5:302024-01-21T17:04:54+5:30

Small Girl Viral Video of saying Vadapav in English : हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला असून जवळपास २ लाख जणांनी तो लाईक केला आहे.

Small Girl Viral Video of saying Vadapav in English : Watch what vada pav is called in English, amazing video of girl, you will not stop laughing | पाहा इंग्रजीत वडापावला काय म्हणतात, लहानगीचा भन्नाट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

पाहा इंग्रजीत वडापावला काय म्हणतात, लहानगीचा भन्नाट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

प्रत्येक भाषेची आपली अशी एक ओळख, ती भाषा बोलण्याची पद्धत असते. ज्यांची मातृभाषा जी आहे ते ती भाषा जास्त चांगली बोलू शकतात. तरीही बोली वेगवेगळी असल्याने एकच भाषा वेगवेगळ्या देशात, राज्यांत वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. इंग्रजी ही जागतिक भाषा असून ती बोलण्याची प्रत्येक देशातील नागरीकांची पद्धत वेगवेगळी असल्याचे आपण पाहतो. पाश्चिमात्य देशांत इंग्रजी वेगवेगळ्या टोनिंगमध्ये बोलली जात असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. भारतीयांसाठी इंग्रजी ही तिसऱ्या क्रमांकावर येणारी भाषा आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये खूप जास्त वैविध्य असल्याने भारतीय बोलत असलेल्या इंग्रजी भाषेची लकब आणखीनच वेगळी आहे (Small Girl Viral Video of saying Vadapav in English). 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगी इंग्रजी बोलताना अतिशय वेगळ्या टोनिंगमध्ये बोलत असल्याचे दिसते. तिचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या लकबीचे कौतुक होताना दिसत आहे. परदेशात इंग्रजी बोलण्याची एक वेगळी पद्धत असते. ते थोडा हेल काढून किंवा वेगळ्या पद्धतीने शब्दांवर जोर देऊन बोलतात असे आपल्याला त्यांचे इंग्रजी बोलणे ऐकून वाटू शकते. पण त्यांच्यासाठी तसे बोलणे अगदीच सामान्य असते. 

व्हिडिओमध्ये ही मुलगी वडापाव खात आहे आणि व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती तिला काही प्रश्न विचारत आहे. इंग्रजीमध्ये वडापावला काय म्हणतात? असे विचारल्यावर साधारण ४ वर्षांची दिसणारी ही चिमुकली काय म्हणते ते पाहण्यासारखे आहे. चेहऱ्यावर अतिशय छान हावभाव, हातवारे करुन ती या प्रश्नाचे एकदम स्टाईलमध्ये उत्तर देते. वाराफाव असे खास इंग्रजी टोनमध्ये ती म्हणून दाखवते. साधारण ५ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड कऱण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला असून जवळपास २ लाख जणांनी तो लाईक केला आहे. 
 

Web Title: Small Girl Viral Video of saying Vadapav in English : Watch what vada pav is called in English, amazing video of girl, you will not stop laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.