गृहिणी असो की वर्किंग वुमन असो. आपलं स्वयंपाक घर हा प्रत्येकीसाठी जिव्हाळ्याचा विषय. सगळ्या घरादाराचं आरोग्य जिथून सांभाळलं जातं, तो घरातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक घरात. स्वयंपाक घर (how to keep kitchen clean and healthy) स्वच्छ ठेवण्याच्या किंवा स्वयंपाकघरात कसं काम करावं, याच्या प्रत्येकीच्या ठरलेल्या पद्धती असतात. पण आपल्याच परिचयातल्या अशा काही मैत्रिणी असतात, ज्यांचं कामंही खूप झटपट होतं शिवाय स्वयंपाकघरही कधीही बघितलं तरी कायम स्वच्छ, चकचकीत दिसतं..
या मैत्रिणी हे सगळं कसं मॅनेज करत असतील, असा प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो. म्हणूनच तर आता रिलॅक्स व्हा आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे, असं समजा. स्वयंपाक घर (kitchen tips for every women) स्वच्छ ठेवण्याच्या तसेच आपलं स्वयंपाक घरातलं काम सोपं, सुटसुटीत व्हावं यासाठी या घ्या काही स्मार्ट टिप्स.. या टिप्स फॉलो करून तुम्ही आणि तुमचं स्वयंपाकघर दोन्हीही बनू शकतं एकदम स्मार्ट..
या काही स्मार्ट किचन टिप्स लक्षात ठेवा...
- स्वयंपाक घरात वेगवेगळ्या पिशव्यांना लावण्यासाठी किंवा एखाद्या कॅरीबॅगचं ताेंड व्यवस्थित पॅक करण्यासाठी आपण रबर वापरतो. एका रबराच्या पाकिटात भरपूर रबरं असतात आणि ती बराच काळ टिकतात. पण पाकीट फोडल्यानंतर काही महिन्यात रबरं एकमेकांना चिटकायला लागतात आणि मग ती चिकट झाल्याने वापरता येत नाहीत. ही रबरं जास्त काळ रहावीत यासाठी ती एका डबीत भरून ठेवा. त्या डबीत कोणतंही टाल्कम पावडर टाका. डबीचं झाकण लावून ती व्यवस्थित हलवा. आता तुमची रबरं वर्षानुवर्षे चांगली राहतील.
- गॅसचं बर्नर (how to clean gas burner) घाण होऊन काळं पडलं असेल तर ते एका वाटीत ठेवा. ते बुडेल एवढं पाणी वाटीत टाका. त्यात साधारण एक ते दिड टेबलस्पून इनो टाका. त्यामध्ये एक लिंबू पिळून टाका. अर्धा- पाऊण तासानंतर बर्नर बाहेर काढा आणि घासणीने थोडे घासून घ्या. बर्नर एकमदम चकचकीत होईल.
- पालेभाज्या निवडल्यानंतर (how to store leafy vegetables) त्या पेपर नॅपकीनमध्ये रॅप करा आणि त्यानंतर त्या एका डब्यात ठेवा आणि आता हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. एअरटाईट डबा नसेल तरी भाज्या बरेच दिवस फ्रेश राहतील.
- आपण लिंबू पिळतो आणि नंतर लिंबाचं सालं टाकून देतो. या सालाचा उपयोग डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी एका काचेच्या बाटलीत पिण्याचं पाणी भरा. त्यात लिंबू पिळून उरलेलं साल कापून टाका. बाटलीचं झाकण लावा आणि ५ तास हे पाणी तसंच राहू द्या. त्यानंतर हे पाणी डिटॉक्स वॉटर म्हणून तुम्ही वापरू शकता. पण यासाठी लिंबू चिरण्यापुर्वी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे.
video credit- Hetal's Art
- बऱ्याचदा आपल्याला भात, खिचडी आसट व्हावी असं वाटतं म्हणून आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो. पण शिट्टी झाली की हे पाणी बाहेर येऊ लागतं. असं होऊ नये म्हणून कुकरमध्ये एक चमचा टाकून ठेवा आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावा. पाणी बाहेर येऊन गॅस व कुकर खराब होणार नाही.
- पातेल्यात पातेलं किंवा वाटीत वाटी अडकली असेल तर खालच्या वाटीच्या तोंडाशी तेल सोडा. त्यानंतर ५ मिनिटातंच वाट्या किंवा पातेले मोकळे होतील.
- फ्रिजमध्ये येणारा घाण वास (how to remove odor from fridge) घालवायचा असेल तर एक वर्तमान पत्राचा कागद घ्या. त्यावर थोडे पाणी शिंपडा. नंतर या कागदाचा बोळा करा आणि हा बोळा फ्रिजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या. १० मिनिटांत फ्रिजमधला दुर्गंध कमी होईल.