उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेक प्रॉब्लेम्स शरीरात उद्भवतात. त्यातील एक म्हणजे पायांना घाम येणे. पायातील घामाच्या दुर्गंधीमुळे अनेकदा चारचौघात लाजिरवाणे वाटते. असे का होते? पायांनाच घाम का सुटतो? असे अनेक प्रश्न साहजिक तुमच्या मनात आले असतील. सॉक्स काढल्यानंतर पायांमधून खूप दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे अनेक जण आपल्यापासून लांब पळतात. घाम येणे हा आपल्या शरीराच्या कूलिंग सिस्टमचा एक आवश्यक भाग आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी, शरीर घामाच्या रूपात ग्रंथींद्वारे अतिरिक्त उष्णता बाहेर टाकते. जेव्हा आपल्या शरीरात घाम येतो, तेव्हा जास्त दुर्गंधी आपल्या पायांमधून सुटते.
यासंदर्भात, हेल्थशॉट्स या वेबसाईटशी बोलताना बंगळूरू स्थित मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट डॉ. दीपा कृष्णमूर्ती सांगतात, “दुर्गंधीयुक्त पायांना वैद्यकीयदृष्ट्या ब्रोमोडोसिस असेही म्हणतात. ही एक अतिशय सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. काही लोकांना एकाच वेळी, पायात ओलसरपणा आणि दुर्गंधी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे सामाजिक ठिकाणी ते शूज किंवा सॉक्स काढणे टाळतात''(Smelly feet? These 8 tips will help you to get rid of the stink).
पायांच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी या टिप्सचे फॉलो करा:
पाय कोरडे ठेवा
जीवाणू आणि बुरशी ओलसर भागात वाढतात, म्हणून पाय कोरडे ठेवा. पाय कोरडे ठेवल्याने दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. आपले पाय पूर्णपणे कोरडे केल्यानंतर, पायांना लोशन लावा.
गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ, हार्ट राहेल सुरक्षित- बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी
सँडल घाला
जर तुम्हाला शूज घालायचे असतील तर, पायांना फिट असलेले शूज घाला. खूप टाईट शूज घालणे टाळा. यामुळे हवा खेळती राहत नाही. ज्यामुळे पायांना घाम सुटतो, व दुर्गंधी पसरते. यासाठी पाय धुवून कोरडे करा. मगच सँडल किंवा शूज घाला.
चांगली स्वच्छता
कृष्णमूर्ती यांच्या मते, "नियमितपणे मोजे बदला, बूट आणि मोजे काढून पाय धुवा. तसेच, पाय धुतल्यानंतर, मोजे आणि शूज घालण्यापूर्वी पाय पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा.
छातीत दुखते, कळ येते - ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका, हार्ट अटॅकची तर ही लक्षणे नाहीत?
प्लास्टिक शूज घालणे टाळा
प्लास्टिक जीवाश्म इंधनापासून तयार केले जाते. जे नैसर्गिक साहित्यांचा वापर करून तयार केले जात नाही. ज्यामुळे आपल्या पायांना हवा मिळत नाही. व पायांच्या त्वचेजवळ घाम अडकतो.
बेकिंग सोडा
आपले शूज काढून टाकल्यानंतर, त्यात थोडं बेकिंग सोडा शिंपडा. हे दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया आणि फेस्टरिंग रोखते. व दुर्गंधी बुटांमध्ये राहत नाही.
एक्सफोलिएशन
कृष्णमूर्त यांच्या मते, नियमित एक्सफोलिएशन केल्यामुळे, पायातील मृत पेशी निघून जातील. दुर्गंधीपासून मुक्त होण्यास खूप मदत होते.
अनवाणी चालणे
जमेल तेव्हा अनवाणी चाला. हवा बुरशी नष्ट करेल, व पायातून दुर्गंधी पसरणार नाही.
सूती मोजे घाला
मोजे नेहमी सुती कापडाचे घालण्याचे प्रयत्न करा. कापूस, लोकर, रेशीम यांसारख्या नैसर्गिक तंतूपासून बनवलेले मोजे घालण्यास प्राधान्य करा. यामुळे पाय निरोगी व दुर्गंधीमुक्त राहेल.