Lokmat Sakhi >Social Viral > Snake Catching Video : बापरे! महिलेनं देशी जुगाड करत पकडला विषारी साप; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

Snake Catching Video : बापरे! महिलेनं देशी जुगाड करत पकडला विषारी साप; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

Snake Catching Video : या महिलेने देशी जुगाड करत हा विषारी साप पकडला आहे. या मादी सर्प पकडणाऱ्या महिलेचं नाव रोशनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:06 PM2022-02-07T18:06:45+5:302022-02-07T18:49:33+5:30

Snake Catching Video : या महिलेने देशी जुगाड करत हा विषारी साप पकडला आहे. या मादी सर्प पकडणाऱ्या महिलेचं नाव रोशनी आहे.

Snake Catching Video : Desi jugaad video woman caught creepy snake seeing ifs officer was also impressed | Snake Catching Video : बापरे! महिलेनं देशी जुगाड करत पकडला विषारी साप; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

Snake Catching Video : बापरे! महिलेनं देशी जुगाड करत पकडला विषारी साप; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

सापाचं नाव जरी काढलं तरी भीतीनं थरकाप होतो.  अचानक समोर साप दिसल्यानंतर रिएक्शन काय असेल याची कल्पनाही करणं कठीण असतं. सध्या केरळमधील तिरुवनंतपुरमचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Desi jugaad video woman caught creepy snake seeing ifs officer was also impressed) वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक महिला कट्टकडा परिसरातून एक भयानक साप पकडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या महिलेने देशी जुगाड करत हा विषारी साप पकडला आहे. या मादी सर्प पकडणाऱ्या महिलेचं नाव रोशनी आहे.

IFS अधिकारी सुधा रमण देखील महिलेच्या साप पकडण्याच्या शैलीने खूप प्रभावित झाल्या आहेत. IFS अधिकारी सुधा रमन यांनी तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रोशनीचा साप पकडण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रोशनी या धाडसी वनकर्मचारीने कट्टकडा येथील मानवी वस्तीतून एक धोकादायक साप पकडला. रोशनी या साप पकडण्यात माहीर आहेत, देशभरातील वनविभागात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

रोशनी या एक वन कर्मचारी आहे. रोशनीचा साप पकडतानाचा 45 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रोशनीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. रोशनीने कापडी पिशवीच्या मदतीने साप पकडला आहे. रोशनीने ही कापडी पिशवी सापासमोर अशा प्रकारे ठेवली की, साप बिळ समजून त्यात घुसला, त्यामुळे सर्पदंशाचा धोका नष्ट टळला.

अजबच आहे! आजीनं दिला नातवाला जन्म; लेकीसाठी आईनं सोसली ‘आईपणाची’ वेदना..

या व्हिडिओला एवढा पसंती दिली जात आहे की, त्याला आतापर्यंत 45 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी रोशनीला 'धाडसी' म्हटले आहे. विशेष म्हणजे जगात सापांच्या 2000 हून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी केवळ 100 प्रजातींचे साप विषारी आहेत. लोकांना याबाबत कल्पना नसल्यानं अनेकांना साप पाहून भीती वाटते.
 

Web Title: Snake Catching Video : Desi jugaad video woman caught creepy snake seeing ifs officer was also impressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.