Join us  

भयंकर!! मुलीच्या चेहऱ्यावरून डोक्यावर सरपटत गेला पिवळ्या रंगाचा साप.. व्हायरल व्हिडिओ, भीतीच वाटेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 2:15 PM

Snake Climbing on Little Girls Head Viral Video : ही मुलगी नुसती खेळत नाहीये तर हा साप तिच्या अंगावरुन थेट तिच्या चेहऱ्यावर सरपटत जाताना दिसतो.

ठळक मुद्देहा साप विषारी आहे की बिनविषारी याबाबतही पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही हा साप काही प्रमाणात तरी पाळीव असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. 

साप म्हटलं की आपण कोणत्याही वयाचे असू तरी आपल्याला ऐकूनही भिती वाटते. मात्र काही जणांना साप म्हणजे इतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच वाटतो. अनेकदा लहान मुलेही सापाशी अगदी सहजरीत्या खेळताना दिसतात. अशाप्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये लहानगे अगदी सहज भल्या मोठ्या सापांना हाताळताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक लहान मुलगी हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या सापाशी खेळताना दिसत आहे. ही मुलगी नुसती खेळत नाहीये तर हा साप तिच्या अंगावरुन थेट तिच्या चेहऱ्यावर सरपटत जाताना दिसतो (Snake Climbing on Little Girls Head Viral Video).

हा व्हिडिओ पाहून आपल्याला काहीशी भिती वाटू शकते. पण ही लहान मुलगी मात्र अगदी सहज या सापाशी खेळताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर भिती किंवा घाण वाटण्याचा साधा लवलेशही दिसत नाही. इतकेच नाही तर हा साप तिच्या ओठांवरुन आणि नाकावरुन वर चढत असताना ती त्याला किस करतानाही दिसते. आपण सापाला पाहूनही जिथे थरथर कापू तिथे ही लहानगी मात्र अगदी सहजरित्या त्याला हाताळताना दिसते. इन्स्टाग्रामवर स्नेक वर्ल्ड नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून व्हिडिओला प्रतिक्रिया देताना अनेकांनी या मुलीच्या धैर्याचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच एक लहानगी आपल्या घरात आलेल्या बलाढ्य अजगराला मागे खेचताना दिसली होती. त्यावेळी तिचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला होता. आता हा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातील किंवा नेमक्या कोणत्या ठिकाणावर शूट केलेला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या सापाची जात काय आहे, तो विषारी आहे की बिनविषारी याबाबतही पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही मात्र हा साप काही प्रमाणात तरी पाळीव असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियासाप