Join us  

..तर खूप वेदना होतात! सीआयडी फेम दया सांगतात, हेअर ट्रांसप्लांटची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2022 1:18 PM

Dayanand Shetty सीआयडी फेम दया म्हणजेच दयानंद शेट्टी यांनी हेअर ट्रांसप्लांट सर्जरी केली आहे. त्यांनी हेअर ट्रांसप्लांट करत असतानाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

सिनेजगतातील अभिनेता आणि अभिनेत्रींना स्वतःच्या लूकची खूप काळजी घ्यावी लागते. ते स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देतात. जर भूमिकेसाठी लूक वेगळा असेल तर, त्यासाठी देखील ते विशिष्ट मेहनत घेतात. मात्र तरीही  वाढत्या वयानंतर केसांची वाढ कमी होते. किंवा विविध प्रॉडक्ट्स लावून केसं गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे टक्कल पडण्याची देखील शक्यता निर्माण होते. अशावेळी कलाकार हेअर ट्रांसप्लांटची निवड करतात. नुकतंच सुप्रसिद्ध सीआयडी फेम दया म्हणजेच दयानंद शेट्टी यांनी हेअर ट्रांसप्लांट सर्जरी केली आहे. त्यांनी हेअर ट्रांसप्लांट करत असतानाचा अनुभव सोशल मीडियावरर शेअर केला असून, किती वेदना सहन कराव्या लागल्या याची माहिती दिली आहे.

दयाने हेअर ट्रांसप्लांट करतानाचा अनुभव एका व्हिडिओमधून शेअर केला आहे. त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं, '' हेअर ट्रांसप्लांटबाबत अनेक लोकं खूप वेदना होतात, सूज येते असे म्हणून घाबरवतात. परंतु, मला असे काही जास्त जाणवलं नाही. हेअर ट्रांसप्लांट करताना ज्या काही वेदना झाल्या त्या २० ते २१ दिवसात कमी झाल्या. पण ज्या जागी ट्रिटमेंट पार पडली, ती जागी सुन्न झालेली आहे. आता औषधे घेणे देखील बंद केलं आहे. मात्र, हेअर ट्रांसप्लांट केलेल्या जागेवर जर काही लागलं तर त्या ठिकाणी खूप वेदना होतात. हेअर ट्रांसप्लांट केल्यानंतर डोळ्यांच्या खाली देखील थोडी फार सूज आली. मात्र, इतर चेहऱ्यावर सूज किंवा इजा झालेली नाही. पुढे काही परिणाम झाल्यास मी चाह्त्यांसोबत शेअर करेन''

अभिनेता दयानंद शेट्टी यांना सीआयडी या मालिकेमधून बरीच प्रसिद्धी मिळाली. त्याचं दया हे पात्र प्रचंड गाजलं. या शोव्यतिरिक्त दया खतरो के खिलाडीमध्येही स्पर्धक होते. ते खतरो के खिलाडीच्या पाचव्या सीझनमध्ये होते.

टॅग्स :सीआयडीकेसांची काळजीसोशल व्हायरलसोशल मीडिया