वातावरणात बदल होऊन आता हळुहळु थंडी पडायला सुरुवात झाली आहे. कुडकुडणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण शक्यतो उबदार कपड्यांचा वापर करतो. थंडी वाढू लागली की हळुहळु वर्षभर बॅगेत ठेवलेले स्वेटर, शाल आणि लोकरीचे कपडे बाहेर येऊ लागतात. थंडीत रोजच असे लोकरीचे उबदार कपडे वापरुन ते खराब होतात किंवा मळतात. अशा उबदार, उनी कपड्यांची स्वच्छता ठेवणे देखील तितकेच आवश्यक असते. असे लोकरीचे उबदार कपडे मळले किंवा त्यांवर डाग पडले तर ते सहजपणे स्वच्छ करता येत नाहीत(How To Use Reetha To Clean Winter Clothes).
उबदार, लोकरीचे कपडे हे फार नाजूक असतात त्यामुळे ते धुताना त्यांची विशेष काळजी देखील घ्यावी लागते. असे उबदार कपडे धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट किंवा लिक्विड सोपंचा वापर करावा लागतो. इतकंच नव्हे हे कपडे धुतल्यानंतर व्यवस्थित वाळवून घ्यावे लागतात. अशा लोकरीच्या नाजूक कपड्यांची योग्य स्वच्छता केली नाही तर ते लवकर खराब होतात किंवा या लोकरीच्या कपड्यांचे धागे उसवतात किंवा असे कपडे लूज पडतात. यासाठी लोकरीचे कपडे धुण्यासाठी महागड्या डिटर्जंट, लिक्विड सोपं पेक्षा आपण औषधी वनस्पती रिठा वापरुन देखील हे उबदार कपडे स्वच्छ करु शकतो. तुमचे उबदार, लोकरीचे कपडे रिठा वापरुन कसे स्वच्छ करायचे ते पहा(Soapnut Peel Can Be Use To Clean Winter Clothes Keeps Them New For Long Time).
उबदार, लोकरीचे कपडे धुण्यासाठी रिठा वापरा...
रिठाच्या सालीने उबदार कपडे धुणे ही एक पारंपारिक आणि नैसर्गिक पद्धत आहे, जी प्राचीन काळापासून वापरली जात आहे. रिठाच्या सालीत नैसर्गिक क्लिनिंग एजंट असतात, ज्यामुळे लोकरीचे उबदार कपडे धुवून स्वच्छ होतात सोबतच त्यांना चमकदारपणा येण्यास अधिक मदत होते. रिठा नैसर्गिकरित्या लोकरीच्या कपड्याचे फायबर खराब होऊ न देता उबदार कपडे स्वच्छ करते. याचबरोबर लोकरीचे कपडे धुण्यासाठी रीठाचा वापर केल्यास हे वर्षानुवर्षे जुने असलेले कपडे कायम नव्यासारखे दिसण्यास मदत होते.
गाद्यांवर पडलेले डाग -घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल...
रिठ्याचा वापर करुन उबदार कपडे कसे धुवावेत...
एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात रिठ्याची सालं रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ही सालं त्याच पाण्यांत हाताने दाबून व हातांवर चोळून फेस काढून साबण तयार करुन घ्या. आता या रिठ्याच्या पाण्यांत लोकरीचे उबदार कपडे अर्धा तास भिजत ठेवा. अर्ध्या तासांनंतर कपडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय केल्याने लोकरीचे उबदार मळके, खराब झालेले कपडे स्वच्छ होतात. कपड्यांतील घाण पूर्णपणे निघून जाते आणि कपड्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
लोकरीचे, उबदार कपडे धुण्यासाठी रिठ्याचा वापर करणे हा एक नैसर्गिक उपाय आहे. यामुळे लोकरीचे उबदार कपडे स्वच्छ धुवून होतात. या हिवाळ्यात उबदार कपड्यांची चमक आणि उबदारपणा टिकवून ठेवण्यासाठी, रिठ्याच्या सालीचा हा नैसर्गिक उपाय अवश्य करा.