सध्याचे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आपण त्याचा विचारही करु शकत नाही. सध्याच्या काळात सर्वांचा सोशल मीडियाकडे कल वाढत आहे. सोशल मीडियाकडे मनोरंजन आणि कनेक्ट राहण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं. यामुळे गेल्या काही वर्षांत फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि ट्विटर युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे ही स्थिती असताना, दुसरीकडे या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळवत असलेल्यांची संख्याही मोठी आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरच्या युझर्सची रील्स आणि स्टोरी पाहिल्यावर आपण देखील असे काहीतरी करून लगेच प्रसिद्धीच्या मार्गावर जाऊ शकतो, असा काही लोकांचा समज झालेला असतो. सोशल मीडियामुळे अनेक सर्वसामान्य व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. सोशल मीडिया हे आता केवळ प्रसिद्धी मिळवण्याचं नाही, तर कमाईचं साधन बनलं आहे. आज अनेक यू-ट्यूबर्स आणि एन्फ्लुएन्सर्स या माध्यमातून कोट्यधीश बनले आहेत.
आजच्या या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात काही अजब - अतरंगी गोष्टी कधी घडतील ते सांगता येत नाही. काहीवेळा सोशल मीडियावर काही अशा गोष्टी व्हायरल होतात की त्या ऐकून आपला विश्वास बसत नाही. जॉर्जियामधील एका तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक- दोन नव्हे तर चक्क हजारो बॉयफ्रेंडस आहेत, असं जर म्हटलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. या हजारो बॉयफ्रेंड्सना रोज सामान वेळ देता यावा यासाठी या पठ्ठीनं एक शक्कल लढवली आहे. तिने असा काही जुगाड केला आहे की ज्यामुळे ती हजारो बॉयफ्रेंड्सना वेळ तर देऊ शकतेच सोबतच, लाखोंची कमाई करुन बक्कळ पैसा देखील कमावत आहे. जॉर्जियाच्या या तरुणीने नेमकं असं काय केलं आहे ते पाहूयात(Social media influencer creates her virtual clone for relationships at $1/minute. 1,000 individuals signup for service).
नेमकं हे प्रकरण आहे तरी काय....
जॉर्जियातील कमिंग येथे राहणारी २३ वर्षीय कॅरीनचे (Caryn Majorie) स्नॅपचॅटवर १८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कॅरिनच्या अनेक चाहत्यांना तिचा बॉयफ्रेंड बनण्याची इच्छा होती. पण कॅरिनला सर्वांसोबत एकाचवेळी डेटवर जाणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत, तिने जुगाड करत असा मार्ग शोधला, ज्यातून तिला प्रचंड पैसाही मिळतो. या कॅरीनचे जरी हजारो बॉयफ्रेंड्स असले तरीही ती त्यांपैकी एकालाही न भेटायला जाता त्यांच्याशी संवाद साधू शकते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, कॅरीन CarynAI क्लोनच्या मदतीने व्हर्च्युअल डेटिंगचा अनुभव देते.
लग्नाच्या गाऊनवर ५० हजार चमचमते क्रिस्टल्स, किंमत तर प्रचंडच पण नेटकऱ्यांना प्रश्न ड्रेस धुणार कसा?
Caryn Marjorie, a Snapchat influencer, has introduced a voice-based AI chatbot of herself.
— Age Of Geeks (@ageofgeeks_in) May 11, 2023
Her chatbot 'CarynAI' uses OpenAI's GPT-4 API and allows subscribers to have a conversation with her for a fee of $1/min.
She expects to earn up to $5 million/month from the service. 🤯 pic.twitter.com/QSqiImD0Zb
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नुकतेच कॅरिनने तिचे स्वतःचे एआय व्हर्जन CarynAI रिलीज केले आहे, जे फॉलोअर्सना त्यांची गर्लफ्रेंड बनवण्यासाठी एक डॉलर म्हणजेच ८२.१८ रुपये प्रति मिनिट इतके पैसे आकारते. कॅरीनच्या सांगण्यानुसार, तिव्ये स्वतःचे बॉट व्हर्जन तयार करण्यासाठी तिने एआय सॉफ्टवेअरवर हजारो तासांचे संभाषण रेकॉर्ड केले होते. कॅरिनच्या मते, भविष्यात ती तिच्या फॅन्ससोबत बोलताना अनेक खासगी गोष्टीही शेअर करेल. कॅरीनने सांगितले की, एआय सॉफ्टवेअरद्वारे सध्या ती एक हजार ‘बॉयफ्रेंड्सना’ डेट करत आहे. यासाठी ते बॉयफ्रेंड्स तिला तासाला एक डॉलर देत आहेत. जर तिच्या १.८ दशलक्ष फॉलोअर्सपैकी २०,००० लोकांनी CarynAI साठी साइन अप केले, तर तिचे AI बॉट दरमहा ५ दशलक्ष डॉलर्स (रु. ४१ कोटींहून अधिक) कमवू शकते.