पॅरासेलिंग करताना दोरी तुटून महिला समूद्रात पडल्याचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो. (त्याची सत्य-असत्यता तपासण्यात आलेली नाही.) अलिबागमध्ये दोन महिलांसोबत पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटल्याचे आणि दोन महिला पाण्यात पडताना दिसते. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी धक्कादायक घटना घडली.
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये दोन महिला पॅरासेलिंग राईडची तयारी करत असल्याचे दिसते. बोटीतून बाहेर येईपर्यंत सर्व काही सुरळीत दिसतं. नंतर राईड सुरु झाल्यावर या दोन महिला समूद्रात पडल्याचे दिसते. आणि त्यामुळे बघणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं.
या दोन्ही महिला मुंबईतील साकी नाका येथील रहिवासी असून कौटुंबिक सहलीसाठी अलिबागला आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. लाइफ जॅकेट असल्याने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्या समुद्रात पडल्यानंतर ऑपरेटरने त्यांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या ठीक असल्याचेही दिसते.आतापर्यंत १४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून मोठ्या प्रमाणातात शेअरही केला जात आहे.