Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : पोरगं लय हूश्शार! ३ वर्षांच्या मुलानं नावासहित मसाले, डाळी ओळखल्या; व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

Social Viral : पोरगं लय हूश्शार! ३ वर्षांच्या मुलानं नावासहित मसाले, डाळी ओळखल्या; व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

Social Viral : तीन वर्षाच्या मुलाने मसाले आणि खाद्यपदार्थांच्या ज्ञानानं सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:49 PM2022-03-01T17:49:00+5:302022-03-01T17:54:37+5:30

Social Viral : तीन वर्षाच्या मुलाने मसाले आणि खाद्यपदार्थांच्या ज्ञानानं सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.  

Social Viral : 3 Year Old Identifies Indian Spices And Pulses Like A Pro Internet Calls Him A Star | Social Viral : पोरगं लय हूश्शार! ३ वर्षांच्या मुलानं नावासहित मसाले, डाळी ओळखल्या; व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

Social Viral : पोरगं लय हूश्शार! ३ वर्षांच्या मुलानं नावासहित मसाले, डाळी ओळखल्या; व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

स्वयंपाकघरात अनेक वर्षे घालवल्यानंतरही, आपल्यापैकी बर्‍याच जणांना  स्वयंपाकाचे पदार्थ नावासहीत ओखळता येत नाहीत. विशेषतः जर ते सारखे दिसत असतील. डाळांमधील फरक आजही आपल्याला गोंधळात टाकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या  चिमुकल्याच्या बाबतीत तसे घडले नाही. अबीर नावाच्या तीन वर्षाच्या मुलाने मसाले आणि खाद्यपदार्थांच्या माहितीनं सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.  (3 Year Old Identifies Indian Spices And Pulses Like A Pro Internet Calls Him A Star)

तो निरागसपणे वेगवेगळ्या मसाल्यांना नावे देताना आणि डाळींमधला फरक ओळखताना दिसत आहे. त्याची सहजता आणि आत्मविश्वास मोठ्यांनाही लाजवेल.  इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अबीरची आई @sonikabhasin यांनी अपलोड केला होता.  शेअर केल्या केल्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. 

अबीरच्या अनेक मनमोहक व्हिडिओंपैकी, ज्याने त्वरित नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे मसाले ओळखण्याचा व्हिडीओ आहे. अबीर तमालपत्र, काळी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी इत्यादी संपूर्ण मसाल्यांची यादी करताना दिसतो. अबीर मूग आणि तूर डाळ यात फरक करू शकतो आणि चणा डाळ देखील ओळखू शकतो.

रिसर्च-निरोगी दीर्घायुष्यासाठी रोजच्या जेवणातून फक्त हे पदार्थ वगळा; वाढत्या वयातही आजारांपासून लांब राहाल

या व्हिडिओला 482k पेक्षा जास्त व्ह्यूज, 40.7k लाईक्स आणि 300 पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत. ज्यामध्ये या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अबीरला @adrish_lokhandwala कडे किराणा सामानाची खरेदी करायला जाणे आवडते! आणि अर्थातच, त्याला हे सर्व माहित आहे." असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. 

Web Title: Social Viral : 3 Year Old Identifies Indian Spices And Pulses Like A Pro Internet Calls Him A Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.