Join us

वाह कमाल! 9 वर्षांचा मुलगा करतो सरसर गोल पराठा! तापल्या तव्यावर जगण्याचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 14:33 IST

Social Viral : त्याच्या प्रतिभेने, कुटुंबासाठी अतिरिक्त कमाईची मदत करण्याच्या उत्सुकतेने नेटीझन्सचं मन जिंकलंय.

मऊ, लुसलुशीत चपात्या बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. रोज स्वयंपाक करत असलेल्या काही बायकांनाही मऊ, गोलाकार चपात्या बनवणं जमत नाही. सध्या सोशल मीडियावर एका ९ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ होत आहे. इंटरनेटवर प्रत्येक वेळी, तरुण मुलांच्या त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे स्टॉल लावल्याच्या कथा मांडल्या जातात.  (9 yr old boys paratha making skill is a hit on the internet)

काही दिवसांपूर्वी, फरीदाबाद येथिल एका 13 वर्षांच्या मुलाच्या चायनीज आणि तिबेटी खाद्यपदार्थ विकत असल्याच्या व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या प्रतिभेने, कुटुंबासाठी  अतिरिक्त कमाईची मदत करण्याच्या उत्सुकतेने नेटीझन्सचं मन जिंकलंय.

आता, फरीदाबादमधील 9 वर्षांच्या मुलाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याचे पराठे फ्लिपिंग कौशल्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. फूडी विशालने यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा मोठ्या तव्यावर पराठे बनवताना दिसत आहे. तो आपल्या कौशल्यानं प्रत्येक पराठा पलटतो आणि प्रत्येक बाजूला व्यवस्थित शिजवतो. 

बोंबला! जोडप्याला रॉयल एंट्री चांगलीच महागात पडली; काही कळायच्या आतच दणकन आपटले; पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ मुलाच्या पार्श्वभूमीवर किंवा कुटुंबावर जास्त प्रकाश टाकत नाही, त्याने रस्त्यावर पराठे विकून उपजीविकेचं साधन का निवडलं याबाबत माहिती समोर आली नाही. हा व्हिडिओ 1.4 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. परंतु नेटिझन्सनी मुलाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. काहींना त्याचे कौशल्य पाहून आश्चर्य वाटले, तर काहींनी रस्त्यावर अन्न विकण्याऐवजी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नपाककृती