शेरशाह चित्रपत्रातील राता लंबिया हे गाणं खूप व्हायरल झालं. इंस्टाग्रामवर या गाण्याच्या व्हिडीओनं तुफान धुमाकूळ घातला. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. (Viral Video) आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आफ्रिकन लोक बॉलिवूड गाण्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. टांझानियातील रहिवासी असलेले दोघं बहिण भाऊ या बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. (Social Viral)
हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीत उतरला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी पुढे आहे आणि एक मुलगा तिच्या मागे उभा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' या बॉलीवूडमधील चित्रपटातील 'रातन लांबियां' या गाण्यावर दोघेही आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये परफॉर्म करत आहेत. शेरशाह चित्रपटातील हे गाणे भारतातही खूप पसंत केले गेले. आता आफ्रिकेतील लोकांनाही ते आवडू लागले आहे.
बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, संगीताची कोणतीही सीमा असू शकत नाही. त्याचवेळी आणखी एका यूजरने सांगितले की, संगीत कोणत्याही भाषेत असले तरी लोकांना ते आवडते. हे संगीताचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.