बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपला फिटनेस आणि ड्रेसिंग स्टाईल, हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मलायका अरोरा चर्चेत आली आहे. नेहमीप्रमाणे मलायका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. (Bollywood actress malaika arora troll on her new viral bra less photo)
कोविड प्रोटोकोल्सचं पालन करत तिनं तोंडाला दोन मास्कही लावले होते. पण नेटिझन्सनी वेगळ्याच मुद्द्यावरून तिला ट्रोल केलं. मलायका पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना तिने जे कपडे घातले होते त्यावरून ती ट्रोल झाली. ब्रा न घालता फक्त शर्ट घालून कशी घराबाहेर जाते, मास्क लावला मग हे असे कसे ब्रा लेस कपडे घालते म्हणून अनेकानी भोचक सल्ले दिले. (Malaika arora troll on her new viral)
ग्रे टिशर्टमधला तिचा फोटो एका फोटोग्राफरनं काढला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानिमित्तानं महिलांनी ब्रा न घालण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या कम्फर्टनुसार ब्रा घालावी की घालू नये हा त्या त्या महिलेचा प्रश्न असतो. या वैयक्तिक विषयावरही लोक चौकशा करतात, तिनं कसं राहायला हवं ते स्वत: ठरवून मोकळे होतात.
याआधीही मराठी अभिनेत्री हेमांगी कवी याच मुद्द्यावरून चर्चेत होती. चपात्या लाटत असलेल्या एका व्हिडीओमध्ये तीनं ब्रा घातली नव्हती त्यावरून सोशल मीडियावर युजर्सनी तिला सुनावलं. त्यानंतर तिची बाई, बुब्ज आणि ब्रा ही पोस्ट खूप व्हायरल झाली.
हेमांगी कवीने या पोस्टमध्ये लिहिले की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉइस असू शकतो!मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! हाँ त्यावरून परिक्षण करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि गॉसिप करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा चॉइस!
लोक काय म्हणाले?
एका युजरनं मलायकाना पाठिंबा देत, ' प्रत्येकाचं आयुष्य आहे त्यांनी ते कस जगावं कसं राहावं त्याच्यावर आहे आणि बाईचा बाई पण त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे जगाव विचार आणि नजर वाईट नसेल ना तर या गोष्टी दिसत नाहीत.' असं म्हटलंय. तर ट्रोलर्सनी, ‘तुला ब्रा घालायला आवडत नाही का? ‘मी पैसे देतो तू ब्रा विकत घे.’ अशा घाणेरड्या, पातळी सोडून निर्लज्ज कमेंट्स काहींनी केल्या. कुणी काय घातले न घातले, विशेषतः महिलांनी की लगेच ट्रोलिंग असे एक भयंकर चित्र सध्या दिसते आहे.