Join us  

Social Viral : कामाचे तास संपल्यानंतर बॉसचा मेसेज आता illegal; 'वर्क फ्रॉम होम'मध्ये लाईट बीलंही कंपनी भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 3:29 PM

Social Viral : Boss not message or call to employee when office hours over : नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल ८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला वर्क फ्रॉम होम (Work From Home) करता येऊ शकतं.

रोज रोज ऑफिसचं काम करून प्रत्येकालाच कंटाळा  आलेला असतो. कधी एकदा काम संपवून आराम करायला मिळतंय असं होतं. पण अनेक ऑफिसमध्ये लोक कामाच्या वेळा (Office Working Hours) संपल्यानंतरही राबताना दिसतात. वर्क फ्रॉम होममध्ये तर काहीजण पूर्ण दिवस काम करतात. पोर्तुगालमध्ये ऑफिसच्या कामाच्या वेळांबाबत एक नवीन नियम समोर आला आहे. 

ऑफिसमधील कामाचे तास संपल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी कॉल किंवा मेसेज, ईमेल करत असलेल्या बॉसला आता शिक्षा मिळणार आहे. पोर्तुगालमध्ये (Portugal) यासाठी एक नवा कायदा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत ऑफिसच्या वेळेच्या आधी आणि नंतर कर्मचाऱ्यांना कामासाठी कॉल किंवा मेसेज पाठवत असलेल्या वरिष्ठांना शिक्षा मिळणार आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार पोर्तुगालच्या संसदेत पारित करण्यात आलेल्या या नवीन नियमाअंतर्गत वर्क फ्रॉम होम दरम्यान कंपन्यांना वीजेचं बील, इंटनेट बील  हे खर्च ही  कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील. नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल ८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला वर्क फ्रॉम होम (Work From Home) करता येऊ शकतं. दरम्यान पोर्तुगाल श्रम कायद्यांमध्ये झालेलं हे  संशोधन दहापेक्षा कमी कमर्चारी असलेल्या कंपन्यांना लागू होणार नाही.

संभोगादरम्यान एक चूक महागात पडली; काही कळायच्या आतच तिला हार्ट अटॅक आला अन् मग... 

पोर्तुगालच्या श्रम आणि सामाजिक सुरक्षा मंत्री Ana Mendes Godinho यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या माहामारीत वर्क फ्रॉम होमची खूप मदत झाली. म्हणूनच रिमोट वर्किंगला जास्त सोपं बनवण्यासाठी हा अध्यादेश लावण्यात आला आहे.  पुढे त्यांनी सांगितलं की, हा कायदा अनेक युरोपीय देशांमध्ये असून फ्रांस, जर्मनी, इटली, स्लोवाकियामध्ये अशा कायद्याला परवानगी देण्यात आली आहे. अशात पोर्तुगाल कर्मचाऱ्यांना फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी सरकारनं ही योजना आखल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलकर्मचारी