Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

Social Viral : आर्थर आणि लुआना यांनी लोकांना हवामान बदलाची जाणीव करून देण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:45 PM2021-09-17T13:45:24+5:302021-09-17T13:59:27+5:30

Social Viral : आर्थर आणि लुआना यांनी लोकांना हवामान बदलाची जाणीव करून देण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे.

Social Viral : Brazil activist couple naked cycling to raise environment climate change awareness | Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत असतो.  कोणी झाडं लावतं तर कोणी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करतं.  सध्या सोशल मीडियावरपर्यावरणाच्या संरक्षणासाठी स्वत:चे कपडे काढत असलेल्या जोडप्यांची कहाणी व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खंर आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी या दोघांनी एक आगळा वेगळा मार्ग अवलंबला आहे. 

ब्राझिलमध्ये राहणारे आर्थर आणि लुआना यांनी लोकांना हवामान बदलाची जाणीव करून देण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. ते ग्रीन एरियात कपड्यांशिवाय सायकल चालवत आहेत आणि लोकांना पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देत आहेत. या ब्राझिलियन जोडप्याचे म्हणणे आहे की त्यांनी लोकांना हवामान बदलाची (Climate Change) जाणीव करून देण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधला आहे.

 'माणिके मॅगे हिते' गाण्यामुळे तुफान व्हायरल झाली तरूणी; वाचा कोण आहे एयर होस्टेस आफरीन

आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवशी (International Day for the Preservation of the Ozone Layer) हे जोडपं सायकवरून विवस्त्रावस्थेत (Naked Cycle Trip) फिरायला  निघालं. ग्रीन एरियामध्ये फिरणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाहिल्यावर ते एकदम आश्चर्यचकितच झाले.

हे काय चाललं आहे, हा काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते, असं ते दाम्पत्य म्हणतं. सुरूवातीला सगळ्यांकडेच त्यांनी विचित्र नजरेनं पाहिलं. जेव्हा त्यांना लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी लोकांना पर्यावरण जागृतीबाबत माहिती दिली.  पर्यावरणाचं संरक्षण करणं  आवश्यक असून, सध्या पृथ्वीवर काय सुरू आहे, याची माहिती हे जोडपं त्या नागरिकांना देतं. आर्थरच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणं सोपं नाही म्हणून ही पद्धत अलंबून आम्ही लोकाचं लक्ष वेधून घेत आहोत. 

 बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

आर्थर ( Arthur O Urso) आणि लुआना (Luana Kazaki) हे दोघेही OnlyFans या अॅडल्ट फोटो सेलिंग साइटवर मॉडेल आहेत. तिथे आपले बोल्ड फोटोज विकून हे जोडपं दर महिन्याला जवळपास 41 लाख रुपयांची कमाई करतं. त्यामुळे विवस्त्रावस्थेत बाहेर फिरण्यात त्यांना काही गैर वाटत नसावं.
 

Web Title: Social Viral : Brazil activist couple naked cycling to raise environment climate change awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.