आजकाल, लग्नाआधी वधू-वरांचे प्री वेडिंग फोटोशूट (Pre wedding photoshoot) करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करून घेण्यासाठी प्रत्येकजण हजारो-लाखो रुपये खर्च करतो. काही फोटोशूट असे असतात, जे पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. आता एका आगळ्या वेगळ्या फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. असं फोटोशूट तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल. (Bride groom dangerous pre wedding photoshoot internet shocked to see it watch funny viral video)
Pre wedding shoots are getting tougher nowadays. Thank God, we got married before all this started! 😀😛😂 #photographers#weddingpic.twitter.com/f4tAOqRrKH
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) March 9, 2022
38 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये वधू आणि वर फोटोशूटसाठी पोज देत असल्याचे तुम्ही पाहू शकता. पण, वराची पोज एकदम वेगळी आणि धोकादायक दिसते. तो पायांच्या ऐवजी हातावर उभा असलेला दिसतो. वधू सतत तिच्या पोझेस बदलत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @josephjohn2611 या यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे.
म्हातारे होईपर्यंत येणार नाहीत सुरकुत्या; रोज रात्री ५ गोष्टी करा, वय वाढीच्या खुणांना राहतील लांब
त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - प्री-वेडिंग शूट अधिक कठीण होत आहे, हे चांगले आहे की मी आधीच सेटल झालो आहे. असं 'प्री वेडिंग' शूट बघायला खूप मजा येते. यावर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले की, नवऱ्याची लग्नानंतर अशी अवस्था होते.